मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

30 लाख फोन कॉल्स, भारतीय लष्काराच्या माहितीसाठी चिनी कंपन्यांची मदत, हेरगिरी प्रकरणाचा मोठा खुलासा

30 लाख फोन कॉल्स, भारतीय लष्काराच्या माहितीसाठी चिनी कंपन्यांची मदत, हेरगिरी प्रकरणाचा मोठा खुलासा

गेल्या आठ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या हालचालींवर ही लोकं नजर ठेवून होती.

गेल्या आठ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या हालचालींवर ही लोकं नजर ठेवून होती.

गेल्या आठ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या हालचालींवर ही लोकं नजर ठेवून होती.

    दिवाकर सिंग, प्रतिनिधी मुंबई, 16 जून :  मुंबईत हेरगिरी प्रकरणात मुंबई पोलीस क्राइम ब्रांचने मोठा खुलासा केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्काराची माहिती मिळवण्यासाठी चीनच्या 3 कंपन्या फोन कॉलासाठी मदत करत असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. मुंबई पोलीस क्राइम ब्रांचला गुप्तहेर चौकशी तपासातून नवी माहिती हाती लागली आहे. मुंबईतून 3 चिनी कंपन्या या भारतीय लष्काराची गुप्त माहिती मिळवण्यासाठी मदत करत होती. या कंपन्याची लोकं भारतात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलेली आहे, त्यांचा पोलीस शोध घेत आहे. हेही वाचा - पुढचे 2 आठवडे धोक्याचे! रोज 1 लाखांहून अधिक रुग्ण वाढणार, WHO चा इशारा या कंपन्यांकडून फोन कॉल्ससाठी एक मार्ग तयार करून देण्यात आला होता. त्यातून पाकिस्तान, चीन आणि नेपाळमध्ये भारतीय लष्कराची गुप्त माहिती पुरवली जात होती. गेल्या आठ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या हालचालींवर ही लोकं नजर ठेवून होती. जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कर काय पाऊलं उचलत आहे. याची संपूर्ण माहितीही फोन कॉलच्या माध्यमातून पुरवली जात असल्याचं समोर आलं आहे. या आठ महिन्याच्या काळात जवळपास 30 लाखांहुन जास्त प्रमाणात फोन कॉल्स करण्यात आले होते. यात 2 लाख मिनिटांपर्यंत बोलणं झालं आहे, अशी माहिती हाती लागली आहे.  या प्रकरणामागे दहशतवाद्यांचा तर हात नाही ना, त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहे. मे महिन्यात पाकिस्तानी हेर रेहमान लकडवालाला  मुंबईतून अटक दरम्यान, मागील मे महिन्यात  भारतीय पाणबुड्या, शस्त्रागारं, नौदलाची ठाणी अशी महत्त्वाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणारा हेर मोहम्मद हरून हाजी अब्दुल रेहमान लकडवाला याला NIA ने मुंबईतून अटक केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम इथल्या हेरगिरी प्रकरणी रेहमान याचं नाव पुढे आलं होतं.  राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्या वेळीच लकडावाला याच्यावर गुन्हा नोंदवला होता. हेही वाचा -कोरोनामुक्त देशात पुन्हा घुसला कोरोना! एका अंत्यविधीनं वाढवली चिंता लकडावाला अनेकदा पाकिस्तानला गेला होता. हेरगिरी बाबत पाकिस्तानमध्ये त्यानं विशेष ट्रेनिंग घेतल्याची माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. 49 वर्षाच्या या पाक हेराला अखेर मुंबईतून अटक करण्यात आली. भारतातील महत्वाच्या लष्करी ठिकाणांची खास करून नौदलाच्या पाणबुड्यांची अतिसंवेदनशील माहिती, नौदलाची ठिकाणे, शस्रागारांचे ठिकाण, यासारखी गुप्त माहिती पाकिस्तानी हेर पाकिस्तानला पोहोचवत होते. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार, नौदलाचे काही जण एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होते. फेसबुक, व्हाॅट्सअपसारख्या सोशल मीडियातून ते संपर्कात होते. धक्कादायक म्हणजे नौदलाशी संबंधित असलेल्यांकडूनच नौदलाची गुप्त माहिती मिळवण्याकरता हा पाकिस्तानी गुप्तहेर त्यांना पैसे देत होता. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Indian army

    पुढील बातम्या