सहा ते आठ तास तरी पुरेशी झोप मिळायला हवी. मात्र अनेक जण तितकी झोप घेत नाही, ज्याचा परिणाम रोगप्रतिकारक प्रणालीवर होतो. कित्येक अभ्यासात दिसून आलं आहे की पुरेशी झोप न घेतल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतरही डॉक्टरही तुम्हाला नीट झोप येते की नाही ते विचारतात. झोपेचा रोगप्रतिकारक क्षमतेशी संबंध आहे. त्यामुळे ज्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होईल अशा गोष्टी टाळा.