मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा झाले ट्रोल, पाहा आता काय केला प्रताप!

भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा झाले ट्रोल, पाहा आता काय केला प्रताप!

भाजपचे आमदार राम कदम यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्त today’s Proud moment या शीर्षकानं प्रभू रामचंद्राचा फोटो ट्वीट केला आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्त today’s Proud moment या शीर्षकानं प्रभू रामचंद्राचा फोटो ट्वीट केला आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्त today’s Proud moment या शीर्षकानं प्रभू रामचंद्राचा फोटो ट्वीट केला आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 5 ऑगस्ट: रामनगरी अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन सोहळा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) पार पडला. राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) कित्येक वर्षांचं स्वप्नं आज प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. भाजपनं देशभरात आनंदोत्सव साजरा केला आहे. हेही वाचा...अयोध्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांनाच भूमिपूजनाचं निमंत्रण, उद्धव ठाकरेंना टोला यात भाजपचे आमदार राम कदम यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्त today’s Proud moment या शीर्षकानं प्रभू रामचंद्राचा फोटो ट्वीट केला आहे. सोबत #Times_Square #USA #AyodhyaBhoomipoojan #ModiHaiTohMumkinHai असे हॅशटॅगही दिले आहेत. यावरून आमदार राम कदम ट्रोल झाले आहेत. 'आता तिकडे रात्र असेल ना....कसे काय असले एडिट फोटो आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून शेयर करू शकता..', 'इन लोगो को फोटोशोप भी थिक से नही आता', 'दाजी आता तिकडे जवळपास सकाळचे 5.30 वाजलेत आणि ही पोस्ट 1 तास आधीची आहे, म्हणजे रात्री 4-4.30 ला तिकडे येवढा प्रकाश आणि वर्दळ असते', 'राम कदम साहेब शेजारी ती bottle दिसतेय ना कशाची आहे हे सांगायची गरज नाही, हा फोटो खोटा आहे. कृपया आमच्या भावना दुखावू नका detele करा ती पोस्ट आधी', अस काही नेटिझन्सनी म्हटलं आहे. तर 'साहेब रामाच्या बाजूला ही बॉटल कसली? फोटोशॉप तरी बरोबर करत चला', हुकलेले नाही तर शिकलेले लोकप्रतिनिधी जनतेने निवडणे हीच खरी काळाची गरज आहे.', 'पोरी पळवून आणण्यापेक्षा फोटोशॉप करणं त्या मानाने बरा धंदा आहे', हे फक्त पोरीपळवे रामभाऊ चं करू शकतात ईडिटेड फोटो + तिकडचा रात्रीचा टाईम', अशा शब्दात नेटिझन्सनी भाजपचे आमदार राम कदम यांना ट्रोल केलं आहे. हेही वाचा...शिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिसानंच काढले अपशब्द, ऑडिओ क्लिप व्हायरल एवढंच नाही तर एकाने तर आमदार राम कदम यांना सल्लाही दिला आहे. सोशल मीडियावर एखादी पोस्ट करताना लोकप्रतिनीधींनी तरी IT Cellकडून थोडी माहिती घ्यावी, असं एकानं आमदार राम कदम यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
First published:

Tags: Ayodhya ram mandir, Ram Mandir, Ram mandir and babri masjid

पुढील बातम्या