Home /News /maharashtra /

नगरसेवकाच्या घणाघाती हल्ल्यानंतर सभा सुरू असतानाच तुकाराम मुंढेंनी सोडलं सभागृह

नगरसेवकाच्या घणाघाती हल्ल्यानंतर सभा सुरू असतानाच तुकाराम मुंढेंनी सोडलं सभागृह

सभा सुरू असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेले. सभागृहात वारंवार त्यांच्यावर टीका करण्यात आल्याने त्यांनी ही भूमिका घेतली.

नागपूर, 20 जून : नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा तीन महिन्यानंतर सुरू होताच सत्ताधारी पक्ष मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना घेरताना दिसून आला. महानगरपालिकेची सभा सुरू असतानाच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेले. सभागृहात वारंवार त्यांच्यावर टीका करण्यात आल्याने त्यांनी ही भूमिका घेतली. नगरसेवक हरीश ग्वालवंशी यांनी मुंढे यांच्यावर घणाघाती टीका करत तुम्ही तुकाराम नावावर कलंक आहात, अशा शब्दांत निशाणा साधला. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी महापौरांना विनंती करुन सभागृह सोडले. शोकप्रस्ताव व अभिननंदन प्रस्तावानंतर नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर त्यांच्या केबिनमध्ये अधिकारी येऊन नारे लावतात त्या संदर्भात उत्तर मागत काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी विचारणा केली. यावेळेस चक्क निगम सचिव रंजना लाड यांची चांगलीच धावपळ झाली असून विचारलेल्या प्रशांवर दिलं नाही, तर महापौर संदीप जोशी हे तयारी न करता येतात, असं निगम सचिव रंजना लाड यांना बोलावं लागलं. मुंढेंच्या मताविरोधात सरकारचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेला राज्य शासनाने नुकतीच अखेर मंजुरी दिली. सभा कोविड-19 नियमांचे पालन करून घेण्यात यावी, असा आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात आला होता. तसंच याबाबत महाराष्ट्र शासनाकडून पत्रक काढण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून नागपूर महापालिका सर्वसाधारण सभा घेण्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर यांच्यात वाद निर्माण झाला होता. कोविड-19 मुळे एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभा न घेण्यात यावी असा निवेदन केलं होतं, तर महापौर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन सभा घेऊ असं स्पष्टपणे जाहीर केलं होतं. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Nagpur news, Tukaram munde

पुढील बातम्या