मतदानाच्या तोंडावर भाजपला धक्का, मोठ्या नेत्याने दिला राष्ट्रवादीला पाठिंबा!

मतदानाच्या तोंडावर भाजपला धक्का, मोठ्या नेत्याने दिला राष्ट्रवादीला पाठिंबा!

लोकसभा निवडणुकीत माळशिरस मधील सर्वच विरोधक एकत्र आल्यानंतर एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य भाजप उमेदवारास मिळाले. पण

  • Share this:

विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी

माळशिरस, 14 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघात आता भाजपने उपरा उमेदवार दिल्याने जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अगदी मतदानाला आठवडा उरला असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत माळशिरस मधील सर्वच विरोधक एकत्र आल्यानंतर एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य भाजप उमेदवारास मिळाले. पण आता विधानसभा निवडणुकीत भाजपने स्थानिक उमेदवार न देता दुसऱ्या जिल्हयातील उमेदवार दिला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाने तो का स्विकारला हे मात्र गुलदस्त्यातच आहे. अनेक सक्षम स्थानिक उमेदवार असताना आम्ही बाहेरच्यांना का मतदान करायचं? अशी भावना माळशिरस मतदारसंघात आहे.

स्थानिक कार्यकर्त्याला डावलून केवळ स्वार्थासाठी बाहेरचा उमेदवार लादला गेल्याने आपण राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतल्याचे  धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे. यामुळे आता माळशिरसमध्ये भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होण्याऐवजी मोहिते पाटील विरूध्द मोहिते पाटील असा सामना होणार आहे.

इतर बातम्या - 58 वर्षीय डॉक्टराने केला महिला रुग्णावर बलात्कार, VIDEO काढून करत होता ब्लॅकमेल

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होत असून 24 ऑक्टोबरला मतमोजनी होईल. त्यामुळे आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

इतर बातम्या - 'प्रकाश आंबेडकरच होणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री'

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

कोणत्या विभागात कोणत्या पक्षाची काय होती स्थिती?

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा - 58

भाजप - 19

शिवसेना - 12

काँग्रेस - 7

राष्ट्रवादी - 16

इतर - 4

उत्तर महाराष्ट्र

एकूण जागा - 47

भाजप - 19

शिवसेना - 8

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 8

इतर - 2

मराठवाडा

एकूण जागा - 46

भाजप - 15

शिवसेना - 11

काँग्रेस - 9

राष्ट्रवादी - 8

इतर - 3

विदर्भ

एकूण जागा - 62

भाजप - 44

शिवसेना - 4

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 1

इतर - 3

कोकण

एकूण जागा - 75

भाजप - 25

शिवसेना - 28

काँग्रेस - 6

राष्ट्रवादी - 8

इतर - 8

इतर बातम्या - प्रचाराचा शेवटचा आठवडा, केंद्रीय मंत्रीही राजकीय फड गाजवणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 01:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading