'प्रकाश आंबेडकरच होणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री'

या प्रचारसभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्याने या उमेदवाराचा राजकीय अभ्यास कच्चा असल्याची चर्चा भिवंडीत रंगली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 11:19 AM IST

'प्रकाश आंबेडकरच होणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री'

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 14 ऑक्टोबर : राज्यात मुख्यमंत्री कोण होणार अशा चर्चा असताना आता प्रकाश आंबेडकरच मुख्यमंत्री होणार असल्याचं वंचितच्या एका उमेदवाराने सांगून टाकलं आहे. वंचितच्या उमेदवाराने ‘आव देखणा ताव’ थेट प्रकाश आंबडेकरच भावी मुख्यमंत्री होणार असल्याचं प्रचारदरम्यान भाषणात म्हटलं आहे.

मात्र या प्रचारसभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्याने या उमेदवाराचा राजकीय अभ्यास कच्चा असल्याची चर्चा भिवंडीत रंगली आहे.वंचीत बहुजन आघाडीने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याने महारष्ट्रात विविध जिल्ह्यात जातीच्या आधारावर उमेदवार निवडणुकीत उतरवले. असाच एक उमेदवार भिवंडी पश्चिममधून सुहास बोंडे हे वंचितकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. यापूर्वी सुहास बोंडे यांनी काही महिन्यापूर्वी भिवंडीआणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे सुहास बोंडे हे खान्देश सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांनी मी भिवंडीकर संघर्ष समितीची स्थापना केली.

या समितीच्या माध्यमातून त्यांनी गेल्या दोन वर्षात नागरी समस्याविषयी विविध आंदोलन केली. मात्र, त्यांनी केलेल्या आंदोलन, धरणे, उपोषणाला  संबधित शासकीय यंत्रणांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचंही समोर आलं आहे. आता मात्र, त्यांनी विधानसभेच्या रणधुमाळीत उडी घेत, उमेदवारी मिळाल्याच्या दिवशी वंचित आघाडीत प्रवेश करून भिवंडी पश्चिम मतदारसंघातून आमदार होण्यासाठी नशीब अजमावत आहे.

इतर बातम्या - प्रचाराचा शेवटचा आठवडा, केंद्रीय मंत्रीही राजकीय फड गाजवणार

या मतदारसंघात विद्यमान भाजपचे आमदार महेश चौघुले, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष शोएब गुड्डू, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजनीमा देऊन एमआयएमकडून खालिद गुड्डूसह मनसे, बसपाचेही उमेदवार रिंगणात आहेत. मात्रया मतदारसंघात भाजप - काँग्रेसमध्ये ‘काटे की टक्कर’ होणार असल्याने इतर उमेदवार या दोघांची किती मते आपल्याकडे खेचतात हे येत्या 24 तारखेला निकालाच्या दिवशी दिसून येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...