मुंबई, 14 ऑक्टोबर : मुंबईमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टराने महिला रुग्णावर बलात्कार केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी बलात्काराचा आरोपाखाली एका डॉक्टरला अटक केली आहे. 58 वर्षीय डॉक्टरवर 27 वर्षीय महिला रुग्णावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर कथितपणे डॉक्टरांनी महिला रूग्णाचे आक्षेपार्ह व्हिडिओही प्रसिद्ध केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Mumbai Police: Mumbai Police: A 58-year-old doctor arrested for allegedly raping, blackmailing, and circulating an objectionable video of a 27-year-old female patient. Case registered, further investigation underway. pic.twitter.com/kVpcYkOv58
— ANI (@ANI) October 14, 2019
रुग्णाचे प्राण बचावतात म्हणून डॉक्टरांना देव मानलं जात. पण डॉक्टर पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरने फसवून बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. तर पोलीस आरोपी डॉक्टरची कसून चौकशी करत आहेत.

)







