आमदार रवी राणांची अखेर सुटका, तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना डिवचलं

आमदार रवी राणांची अखेर सुटका, तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना डिवचलं

राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आमदार राणांचा आरोप

  • Share this:

अमरावती, 15 नोव्हेंबर: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा (Bdanera MLA Ravi Rana) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. रविवारी अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा कोर्टानं जामीन मजूर केला. अखेर रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

तुरुंगातून बाहेर येताच आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. राज्य सरकारवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचं आमदार राणा यांनी म्हटलं आहे. हजारो शेतकऱ्यांसह सोमवारी 'मातोश्री'वर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा... एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात हलवलं

आमदार रवी राणा यांनी तीन दिवसांपूर्वी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं. रवी राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने 20 शेतकऱ्यांसह रवी राणा तीन दिवसांपासून अमरावती कारागृहात आहेत. आमदार राणा कारागृहात असून प्रशासनाने दखल घेतली नसल्याचां आरोप केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा रविवारी शेतकऱ्यांना घेऊन मुंबई रवाना होणार असून उद्या (सोमवारी) मातोश्री समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

पतीच्या सुटकेसाठी नवनीत राणा दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी, लॉकडाऊन काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करण्यात यावे आणि तुरुंगात असलेले आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांची सुटका करावी, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरल्या.

अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या रविवारी नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शहरातील राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं. सरकार विरोधात घोषणाबाजी करत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत आंदोलन केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी ही कारागृहात करण्यात आली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्या अटकेबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून रवी राणा यांच्या अटकेबद्दल ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.'शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो' असं फडणवीस म्हणाले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी जेलभरो आंदोलन केलं होतं.

हेही वाचा..पतीच्या सुटकेसाठी नवनीत राणा दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर, जाळला पुतळा

आमदार रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: November 15, 2020, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading