काश्मीरमध्ये हंगामातली पहिली बर्फवृष्टी; मुंबईकर लुटतायत आनंद ! पाहा Exclusive Video

काश्मीरमध्ये हंगामातली पहिली बर्फवृष्टी; मुंबईकर लुटतायत आनंद ! पाहा Exclusive Video

निसर्गाने नटलेल्या काश्मीरच्या सौंदर्यात आता आणखीनच भर पडली आहे. हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीचा आनंद पर्यटक घेत आहेत.

  • Share this:

गुलमर्ग 15 नोव्हेंबर: पृथ्वीवरचा स्वर्ग कुठे आहे असं विचारलं तर काश्मीर हे उत्तर दिलं जातं.  जम्मू काश्मीर हे राज्य आहेच तेवढं सुंदर, निसर्गाच्या सगळ्या वैशिष्ठ्यांनी नटलेलं. आणि आता तर काश्मीरचं सौंदर्य अधिकच खुललं आहे कारण जम्मू काश्मीर आणि लडाखच्या काही भागात वर्षातली पहिली बर्फवृष्टी झाली आहे. अनेक पर्यटक काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या अदद्भूत सौंदर्याचा आनंद लुटत आहेत.

हिमवृष्टीमुळे रस्त्यावर बर्फाचे स्तर साचले आहेत. त्यामुळे श्रीनगर –लेह मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. काश्मीरच्या बारामुल्ला, गुलमर्ग आणि सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे. उंचच उंच झाडं, डोंगर आणि डोंगरावर पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर यामुळे काश्मीर खोऱ्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं आहे. देशभरातून पर्यटक काश्मीरमध्ये भटकंतीसाठी येत असतात. मुंबईच्या काही पर्यटकांनी काश्मीरमध्ये जाऊन बर्फासोबत खेळण्याचा आनंद लुटला.

हिमवृष्टीमुळे काश्मीरच्या तापमानामध्ये बरीच घट झाली आहे. हिमवृष्टीमुळे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरली आहे. यंदा कोरोनामुळे काश्मीरच्या पर्यटनाला फटका बसला असला तरी हळूहळू पर्यटक काश्मीरकडे पुन्हा वळू लागले आहेत. पुढच्या 1-2 महिन्यात पर्यटकांची संख्या अजून वाढणार असल्याचं चित्र आहे.

हिमवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर बाहेरच्या देशात जाण्यापेक्षा आपल्याच देशातील काश्मीरमध्ये जा. अशा इथल्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया आहेत.जगातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड ठिकाण म्हणून काश्मीर ओळखलं जातं. त्यामुळे पुढचे काही दिवस इथलं तापमान असंच राहणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 15, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या