मुंबई, 23 जुलै: बकरी ईदसाठी केंद्र सरकारने केलेल्या नियमावलीवरुन एमआयएम खासदार इम्तियाज जलील चांगले आक्रमक झाले. ही नियमावली मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करा, असा सल्ला दिला जातो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला ज्या कार्यक्रमाला जाणार आहेत, तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही, असा प्रश्नही खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. हेही वाचा.. पाकिस्तानी रेहान सिद्दीकीवर अखेर बंदी, शिवसेना खासदाराच्या पाठपुराव्याला यश मात्र, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या टीकेवर आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि जातीय विद्वेषातून असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन यांची तुलनाच अयोग्य आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकीत मतांसाठी जलील यांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान, बकरी ईदसाठी मशीद उघडण्यास तसेच प्राण्यांची कुर्बानी द्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. मात्र, कोरोना परिस्थिती पाहता महापालिका हद्दीत सूट मिळणार नाही, असे आदेश औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. यावरून नाराज झालेल्या इम्तियाज जलील यांनी बकरी ईदसाठी सरकारने केलेल्या नियमावली मान्य नसल्याचं म्हटलं आहे. नक्की कोण अधिकारी आणि काय विचार करून, असे नियम बनवतात? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. आणखी काय म्हणाले इम्तियाज जलील? इम्तियाज जलील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बकरी ईदवर घातलेल्या निर्बंधांचा विरोध केला आहे. जलील म्हणाले की, बकरी ईदसाठी खेड्या-पाड्यावरुन लोक आपली जनावरं घेऊन येत असतात. त्यांनी काय करायचं? यावेळी त्यांनी बकरे खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेलाही विरोध केला. हेही वाचा… कोरोना रुग्णांच्या नाश्त्यात उंदराची विष्ठा आणि अळ्या, पाहा पोलखोल करणारा VIDEO श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतील. मात्र गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे? असा सवालही त्यांनी केला आहे. यासोबतच ज्यांच्याकडे केवळ एक-दोन बकरे असतात, त्यासाठी त्यांनी आता काय यासाठी फोन घ्यायचा का? असा सवालही त्यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.