कोरोना रुग्णांच्या नाश्त्यात उंदराची विष्ठा आणि अळ्या, प्रशासनाची पोलखोल करणारा VIDEO व्हायरल

कोरोना रुग्णांच्या नाश्त्यात उंदराची विष्ठा आणि अळ्या, प्रशासनाची पोलखोल करणारा VIDEO व्हायरल

चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विलगीकरण केंद्रात हा धक्कादायक प्रकार समोर आल्या आहेत.

  • Share this:

हैदर शेख (प्रतिनिधी),

चंद्रपूर, 23 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात चंद्रपूर शहरातील विलगीकरण केंद्रातीत कोरोना रुग्णांच्या नाश्त्यात अळ्या आणि उंदराची विष्ठा आढळल्याने खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विलगीकरण केंद्रात हा धक्कादायक प्रकार समोर आल्या आहेत. अपऱ्या सुविधांमुळे विलगीकरण केंद्रातील रुग्ण आधीच त्रस्त आहेत. त्यात आता नाश्त्यात अळ्या सापडल्यानं रुग्णांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही व्यवस्थेत सुधारणा झाल्या नाहीत. अखेर एका रुग्णानं स्वतः पुढाकार घेऊन या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने या प्रकरणी दखल देण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

हेही वाचा...नायडू यांचं 'ते' वक्तव्य शिवभक्तांच्या भावना दुखावणारं, संभाजी ब्रिगेड आक्रमक

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्या कोरोनाबाधितांची संख्या 300 च्या वर पोहोचली आहे. तर अद्याप 747 नुमने प्रतीक्षेत आहेत. 184 कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत. सध्या 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करता आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. चंद्रपूर शहरात येण्यास लोकांना मज्जाव असल्यामुळे नवीन रुग्ण दाखल होण्याची शक्यता कमी झाली आणि प्रशासनाला बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं सोपं झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही मुख्यतः जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमुळे वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 90 हजार लोकं हे बाहेरील जिल्ह्यातून दाखल झाले असले तरी यामुळे कोरोनाचे समूह संसर्ग झालेला नाही.

हेही वाचा...वॅक्सीनं आलं तरी कोरोना संसर्गाचा धोका आणि भीती किती कमी होणार?

पण अशा प्रकारे बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचा रोख कायम राहिल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात ही बाहेरून येणारी संख्या थांबविता आली. याचा ही फायदा पुढील काळात कोरोनाचा अटकाव करण्यात होणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 23, 2020, 1:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading