जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...तर उद्धव ठाकरेंचे कपडे फाडणार; नितेश राणेंची राऊतांना थेट धमकी

...तर उद्धव ठाकरेंचे कपडे फाडणार; नितेश राणेंची राऊतांना थेट धमकी

राणेंचा राऊतांवर जोरदार निशाणा

राणेंचा राऊतांवर जोरदार निशाणा

भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 मे :  भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ’ तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडावेत अशी संजय राऊत यांचीच इच्छा दिसते, असा उपरोधिक टोलाही नितेश राणे यांनी राऊतांना लगावला आहे. नितेश राणे यांनी नेमकं काय म्हटलं?  भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी टीका करताना संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ’ तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी अलिबागमध्ये दमदाटी करून जागा घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांनी अवघ्या काही रुपयांमध्ये घेतली असं राणे यांनी म्हटलं आहे. मणिपूर पेटलं असताना मोदी..; कर्नाटक निवडणुकीवरून राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप पत्राचाळीवरून निशाणा  दरम्यान पत्राचाळ प्रकरणावरूनही नितेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. मराठी माणसांची पत्राचाळमध्ये यांनी घरे लाटली त्याप्रकरणात त्यांची आज कोर्टात हजेरी आहे. कैदी नंबर 89 59 ची आज कोर्टात हजेरी आहे, अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात