Home /News /maharashtra /

प्रताप सरनाईक काही साधूसंत नाहीत, EDच्या छापेमारीनंतर नारायण राणेंचा खोचक टोला

प्रताप सरनाईक काही साधूसंत नाहीत, EDच्या छापेमारीनंतर नारायण राणेंचा खोचक टोला

कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं.

सिंधुदुर्ग, 24 नोव्हेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर अमंलबजावणी संचालनालयानं (ED)छापा टाकला. EDने प्रताप सरनाईक यांच्या 10 हून अधिक ठिकाणांवर कारवाई केली. सरनाईकांचे चिरंजिव विहंग सरनाईक ( vihang sarnaik) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईनंतर शिवसेनाविरुद्ध भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. भाजप खासदार नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांनी सरनाईक यांना खोचक टोला लगावला आहे. प्रताप सरनाईक काही साधूसंत नाहीत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा......तर ती कोणती मर्दानगी होती? BJP नेत्यानं कंगनावरून संजय राऊतांना पुन्हा डिवचलं प्रताप सरनाईक यांच्यावर कायदेशीर कारवाई आहे आणि कायदेशीर बाबींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. मीडियानं आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ, असं नारायण राणे यांनी पत्रकरांना ऐकवलं. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या सुपुत्र पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले... 'जर चूक काही नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. मात्र, चूक केली असेल तर संबंधित तपास यंत्रणा योग्य ती कारवाई करेल' अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवर सावध प्रतिक्रिया दिली. 'ईडीने जर छापा टाकला असेल तर त्यांच्याकडे काही तरी माहिती असेल, काही तक्रारी असतील. त्याशिवाय ईडी छापा टाकत नाही. मी सध्या सोलापूर दौऱ्यावर त्यामुळे सविस्तर माहिती नाही' असं म्हणत फडणवीस यांनी ईडीच्या कारवाईचे स्वागत केले. आणखी कोण काय म्हणालं...? भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी असं म्हटले आहे की, 'राजकीय सूडापोटी अशाप्रकारे कोणतही कारवाई करण्याचं कारण नाही आहे. ईडी स्वतंत्र स्वायत्त आहे, कायद्याने दिलेल्या चौकटीत ते कारवाई करतात.' या कारवाईशी भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. तर दुसरीकडे 'जर ईडीकडे काही तक्रारी आल्या असतील, तर त्यांनी केलेली त्यांच्या स्तरावरील ती कार्यालयीन कारवाई आहे. त्याच्याशी भाजपाचा संबंध असण्याचे काही कारण नाही आहे. असं असतं तर सरसकट झालं असतं, स्वैराचार माजला असता. त्यामुळे मला वाटत नाही असं जाणीवपूर्वक काही केलं आहे. यथावकाश यातील सत्य बाहेर येईल.' राजकीय सूडबुद्धीने अशाप्रकारची कारवाई झाली नसल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. हेही वाचा..ED, CBI हे त्यांच्या हातचं बाहुलं; छगन भुजबळ यांचा भाजपवर हल्लाबोल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सेनेवर टीका केली आहे. 'शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या परिवाराच्या अनेक कंपन्यांवर ईडीने धाड टाकली आहे. जर बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कारवाई व्हायलाच हवी. शिवसेना आणि त्यांचे मोठे नेते आहेत, जे मुख्य आहेत त्यांच्या परिवारांच्या उद्योगांबाबत सर्वांना माहित आहे. ईडीच्या कारवाईचं स्वागत आहे,' असं म्हणत किरीट सोमय्या यांनी सेना नेत्यांवर निशाणा साधला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Maharashtra, Narayan rane, Shiv sena

पुढील बातम्या