• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मराठा आंदोलन दडपलं तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, राणेंचा इशारा

मराठा आंदोलन दडपलं तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, राणेंचा इशारा

मराठा आरक्षणाचा प्रश्न याबाबत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधपक्ष भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

  • Share this:
कुडाळ(सिंधुदुर्ग), 14 डिसेंबर: राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी पहिला दिवस आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न , आरोग्याचे प्रश्न , शिक्षणाचे प्रश्न , मराठा आरक्षणाचा प्रश्न याबाबत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधपक्ष भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्यात भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारवर सडकून टीका केली आहे. एवढंच नाही तर सरकारला धमकी वजा इशारा देखील दिला आहे. मराठा आंदोलन दडपलं तर सरकरला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा नारायण राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे. हेही वाचा...Agricultural Reforms Bill: कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना निर्यातीस मिळणार चालना नारायण राणे यांनी कुडाळ येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न , आरोग्याचे प्रश्न , शिक्षणाचे प्रश्न , मराठा आरक्षणाचा प्रश्न याबाबत कोणतीही चर्चाच करायची नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन फक्त दोनच दिवस ठेवण्यात आल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. जर सरकार म्हणतंय की, कोरोना कमी होतोय तर अधिवेशन किमान दहा दिवस ठेवायला हवं होतं. सरकारमधल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची जनतेचे प्रश्न सोडवण्याची इच्छाच नाही, असा टोला राणे यांनी यावेळी लगावला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास सरकारच जबाबदार नारायण राणे यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या पदरी अपयश पडलं आहे. याला राज्य सरकारच जबाबादार आहे. सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीनं बाजू मांडता आली नाही. मात्र, आता याचे राज्यात जे काही दुष्परिणाम होतील, त्याला सरकारच कारणीभूत असेल. मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात त्याचबरोबर नोकरीत आरक्षण मिळालं होतं. ते देखील सरकारला टीकवता आलं नाही. सरकारला मराठी आरक्षणावर बोलायच नाही, म्हणून हिवाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेण्याचा घाट घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य दिवाळखोरीत काढण्यात येत आहे. याला सरकारमधील मंत्री जबाबदार आहेत. महाराष्ट्राची ख्याती, मिळालेलं नावलौकीक देखील धुळीस मिळवण्याचं काम हे सरकार करत आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. दरम्यान, मराठा आरक्षण, वीज बिलाचा मुद्दा ऐरणीवर असून पूरग्रस्त, दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवर भाजप आक्रमक झाली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांनी आंदोलन केलं. सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हेही वाचा...भाजपला धक्का देत MIM चा दक्षिणेत मोठा प्लॅन; कमल हसनबरोबर हातमिळवणी? काय म्हणाले अजित पवार? मराठा आरक्षण स्थगिती उठवावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारचा सुप्रीम कोर्टात लढा सुरू असून मराठा समाजाला न्याय मिळणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दुसरीकडे, मराठा क्रांती मोर्चाचे काही सदस्य विधान भवनाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. आता मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांना आझाद मैदानात परत पाठवण्यात आलं आहे. परंतु तरीही एक गट मात्र विधान भवनाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असल्याचं समजतं.
Published by:Sandip Parolekar
First published: