जाहिरात
मराठी बातम्या / देश / भाजपला धक्का देत MIM चा दक्षिणेत मोठा प्लॅन; कमल हासनबरोबर हातमिळवणी?

भाजपला धक्का देत MIM चा दक्षिणेत मोठा प्लॅन; कमल हासनबरोबर हातमिळवणी?

भाजपला धक्का देत MIM चा दक्षिणेत मोठा प्लॅन; कमल हासनबरोबर हातमिळवणी?

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये ( Bihar Election) एक प्रबळ दावेदार म्हणून समोर आल्यानंतर असदुद्दिन ओवेसी यांच्या पक्षाने (MIM) आता दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी सुपरस्टारबरोबर हातमिळवणी करण्याचा प्लॅन आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    चेन्नई, 14 डिसेंबर : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एक प्रबळ दावेदार म्हणून समोर आल्यानंतर असदुद्दिन ओवेसी यांच्या (Asaduddin owaisi) ऑल इंडिया मजलिसे इत्तहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएम (MIM) पक्षाने आता येत्या वर्षात होऊ घातलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका लढण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठई दक्षिणेतले सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांच्या मक्कल निधी मैनम, अर्थात एमएनएम (MNM) पक्षासोबत युती करत किमान 25 जागा लढवण्याची त्यांची तयारी असल्याचे समजतं. ओवेसी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितल्यानुसार, येत्या वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत एमआयएम 25 तरी जागा लढवणार आहे. कमल हासन यांच्या ‘एमएनएम’ सोबत संभाव्य युतीबाबत बोलणी सुरू असल्याचीही माहिती सूत्रांकडून कळते आहे. “ओवेसी हे त्यांच्या पक्षाच्या तामिळनाडू पदाधिकाऱ्यांसोबत आज (सोमवारी) हैद्राबाद इथं चर्चा करणार आहेत. पक्ष त्रिची आणि चेन्नई या दोन ठिकाणी सभांचे आयोजन करणार आहे.” असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान हासन यांनी सोमवारीच त्यांचा पक्ष या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. मी कुठल्या मतदारसंघातून लढेल याबाबत लवकरच कळवणार असल्याचेही ते बोलले. तसे पाहता ओवेसी आणि हासन यांच्यात यापूर्वीच एकवाक्यता आढळून आली होती जेव्हा हासन यांच्या एका वक्तव्याला ओवेसी यांनी पाठिंबा दिला होता. महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसे याला दहशतवादी म्हटले जावे असे ते वक्तव्य होते. बिहार निवडणुकांत पाच मुस्लिमबहुल मतदारसंघांत मोठा विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिल्याने एमआयएम सध्या फॉर्मात आहे. नुकत्याच पार पडलेल्या हैद्राबाद स्थानिक निवडणुकांमध्येही भाजपसमोर  कडवे आव्हान उभे करत एमआयएमने दुसरा क्रमांक राखला. 2011 च्या जनगणनेनुसार तामिळनाडूतली मुस्लिम लोकसंख्येचा टक्का 5.86 इतका असून तिथेही यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत ओवेसी यांनी कंबर कसलीय. एआयएमआयएमच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष वकील अहमद यांनी मागे एका न्यूज वेबसाईटला सांगितल्यानुसार त्यांच्या पक्ष कुठल्या जागा लढवायच्या हे ठरवायला राज्यात सर्वेक्षण करत होता. द्रविड मुन्नेत्र कझगम (डीएमके)सोबतही त्यांनी बोलणी केली होती मात्र काही निरोप आला नाही. ऑल इंडिया अण्णा मुन्नेत्र कझगम (एआयडीएमके) तर भाजपसोबत असल्याने त्यांच्यासोबत जाण्यास आम्ही नकार दिलाय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात