मुंबई, 31 डिसेंबर : आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्षानिमित्त अनेकजण वेगवेगळे संकल्प करतात. असाच एक संकल्प आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र सोमय्या यांचा हा संकल्प ठाकरे गटाच्या अडचणी वाढवणारा ठरवू शकतो. त्यांनी ट्विट करत एकप्रकारे ठाकरे गटाला इशाराच दिला आहे. 'उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षांत ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, किशोरी पेडणेकर यांची एस आर ए सदनिका, मुंबई महापालिकेतील घोटाळा याचा सर्व हिशोब पूर्ण करणार' असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उद्या पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात
ठाकरे परिवाराचे १९ बंगले अनिल परब हसन मुश्रीफ असलम खान चे स्टुडिओ किशोरी पेडणेकर एस आर ए सदनिका मुंबई महापालिका यांचा घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/DLR2ie7z1g — Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2022
सोमय्या यांनी नेमकं काय म्हटलं?
किरीट सोमय्या यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी ठाकरे गटाला एकप्रकारे इशाराच दिला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षांत ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, किशोरी पेडणेकर यांची एस आर ए सदनिका, मुंबई महापालिकेतील घोटाळा याचा सर्व हिशोब पूर्ण करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. आता सोमय्या यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटातील नेते आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Kirit Somaiya, Shiv sena, Uddhav Thackeray