जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांवर दबाव टाकला, तक्रारदारही खोटेच; सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट

...त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांवर दबाव टाकला, तक्रारदारही खोटेच; सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आज सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.  संजय राऊत यांनी न्यायालयात खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी नेमकं काय म्हटलं?  किरीट सोमय्या यांनी आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नील सोमय्या आणि आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोर्टात खोटी शपथपत्र दिली गेली. बोगस तक्रारदार उभे करण्यात आले. ज्या व्यक्तीने तक्रार दिली तो माणूसच अस्तित्वात नाही. त्याचा फोनही लागत नसल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. हेही वाचा :      शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट; अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढणार? उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल   दरम्यान त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे हे खोटारडे मुख्यमंत्री होते. तक्रार घेण्यासाठी पोलीस आयुक्तांवर उद्धव  ठाकरे यांनी दबाव टाकला, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. कोर्टात खोटी शपथपत्र देण्यात आली. बोगस तक्रारदार उभे करण्यात आले असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. दरम्यान सोमय्या यांच्या या आरोपांना आता ठाकरे गट काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात