मुंबई, 20 डिसेंबर: भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (bjp leader spoke person keshav upadhye) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांनी सोशल माध्यमातून रविवारी केलेल्या निवेदनावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्र्याचं आजचं भाषण म्हणजे कृती आणि उक्ती यांच्यातल्या अतंराच उत्तम उदाहरण होतं, शब्दांत केशव उपाध्यय यांनी समाचार घेतला आहे.
गेले वर्षभर सरकार विकास करीत असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ जी चार उदाहरण दिली ती सर्व कामे मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती.
हेही वाचा...होय मी अहंकारी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला भाजपच्या टीकेवर पलटवार
केशव उपाध्यय यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्याना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले अभिमान आणि अहंकार यात अंतर असते. मुंबईबद्दल अभिमान असलाच पाहिजे. पण अहंकारातून मुंबईकरांच नुकसान करीत आहात. ज्या कांजूरमार्गचे समर्थन करत आहात तिथल्या कारशेड अडचणी आपण नेमलेल्या मनोज सौनिक समितीनं दाखवून दिलं आहे. कांजूर कारशेडचा फिजीबिलीटी रिपोर्ट व अन्य अहवाल याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही.
अभिमान आणि अहंकार यात अंतर असते. मुंबई बद्दल अभिमान असलाच पाहिजे पण अहंकारातून मुंबईकरांच नुकसान करीत आहात. ज्या कांजूरमार्गचे समर्थन करत आहात तिथल्या कारशेड अडचणी आपण नेमलेल्या मनोज सौनिक समितीने दाखवून दिले आहेत. कांजूर कारशेडचा फिजीबिलीटी रिपोर्ट व अन्य अहवाल कुठे ४
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 20, 2020
मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता. इतर काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेनला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचं वैशिष्ठ आहे, असा शब्दांत उपाध्यय यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
मेट्रो कारशेड हा कुणाच्या श्रेयाच्या प्रश्न नाही तर मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सेवेचा आहे. त्यामुळे अन्यत्र लक्ष वेधण्यापेक्षा उद्धव ठाकरे सरकारनं नेमलेल्या मनोज सौनिक सरकारचा अहवाल आजच्या भाषणात मांडायला हवा होता. म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात आले असते.
याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही. मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता इतरत काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेन ला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ठ आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 20, 2020
काय म्हणाले मुख्यमंत्री?
सध्या गाजत असलेल्या कांजूरमार्गच्या मेट्रो 3 कारशेडवरून भाजपकडून वारंवार होणाऱ्या टीकेवर 'होय मी अहंकारी!' अशा शब्दांत ठणकावत मुख्यमंत्र्यांनी पलटवर केला. होय मी अहंकारी आहे. माझ्या मुंबईसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, असं मुख्यमंत्र्यांनी छातीठोकपणे सांगितलं. माझ्या अहंकाराचा प्रश्न मुळीच नाही. पण तुमचीही नसावा, असं आवाहनही त्यांनी भाजपला केलं.
महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी मी आहे. आरे कारशेडची जागा मेट्रो 3 साठी होती. त्यामध्ये आरे कारशेडमध्ये 30 हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्या 30 हेक्टरमध्ये ती जागा वापरणार नाही, असं लिखित दिलं आहे. आता ती जागा वापरणार नाही तर या प्रकल्पामध्ये घेतली कशाला? ज्या मेट्रोचे काम 3 वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यासाठी आणखी जागा लागली तर इतर जागा घेतली जाईल. फक्त एकाच लाईनासाठी कारडेपो का करायचा? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केला.
मुख्यमंत्री @OfficeofUT यांच आजच समाजमाध्यमावरील भाषण म्हणजे कृती व उक्ती यांच्यातल्या अतंराच उत्तम उदाहरण होते. वर्षभर सरकार विकास करीत असल्याचा दावा त्यांनी केला व समर्थनार्थ जी उदाहरण दिली ती सर्व कामे मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झालीहोती. २
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 20, 2020
कांजूरमार्ग येथील जमीन ही केंद्र सरकारची असेल, नसेल हा वाद आपण सोडवू शकतो. केंद्रानं राज्याशी चर्चा करून हा वाद सोडवणं अपेक्षीत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून सांगितलं. आम्ही विरोधकांनाही श्रेय द्यायला तयार आहे. पण चर्चा न करता भाजप राजकारण करत असल्याच आरोप त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा...मेट्रो कारशेडच्या प्रकल्पात तो उल्लेख का नाही?मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
जनतेची जागा बिल्डरच्या घशात न घालता ती जनतेसाठीच वापरण्यात येत आहे. पुढील 50, 100 वर्षांचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी माझी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कांजूरला 3, 4 आणि 6 या मेट्रोच्या तीन लाईन्ससाठी कारशेड करू शकतो. पहिल्या मेट्रो प्रकल्पात स्टर्लिंग लाईनचा उल्लेख नव्हता, असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर साधला होता.
मेट्रोसाठी कालांतरानं आरेचं जंगल नष्ट झालं असतं, त्यामुळे राज्य सरकारनं मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता, असंही त्यांनी सांगितलं.