मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मेट्रो कारशेडच्या प्रकल्पात तो उल्लेख का नाही? मुख्यमंत्र्यांचा भाजपवर गंभीर आरोप

मेट्रो कारशेडच्या प्रकल्पात तो उल्लेख का नाही? मुख्यमंत्र्यांचा भाजपवर गंभीर आरोप

जर विकास करायचा असेल तर हा योग्य नाही का? मग तुम्ही सांगा मला, जे आम्ही करतोय तो अहंकार आहे की उपयोग आहे?

जर विकास करायचा असेल तर हा योग्य नाही का? मग तुम्ही सांगा मला, जे आम्ही करतोय तो अहंकार आहे की उपयोग आहे?

जर विकास करायचा असेल तर हा योग्य नाही का? मग तुम्ही सांगा मला, जे आम्ही करतोय तो अहंकार आहे की उपयोग आहे?

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 20 डिसेंबर : मेट्रो कारशेड (metro car shed) प्रकल्पावरून  भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे. हायकोर्टानेही कांजूरमार्गच्या कामाला स्थगिती दिली आहे. आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्यावर भाष्य करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. मेट्रोच्या पहिल्या प्रकल्पात 'स्टर्लिंग लाईन' चा उल्लेखच करण्यात आला नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असताना मेट्रो कारशेडच्या वादावर रोखठोक भूमिका मांडली आहे. 'मी मुंबईसाठी अहंकारी आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी आहे.  आरे कारशेडची जागा मेट्रो 3 साठी होती. त्यामध्ये आरे कारशेडमध्ये 30 हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्या 30 हेक्टरमध्ये ती जागा वापरणार नाही, असं लिखित दिले आहे. आता ती जागा वापरणार नाही तर या प्रकल्पामध्ये घेतली कशाला?  ज्या मेट्रोचे काम 3 वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यासाठी आणखी जागा लागली तर इतर जागा घेतली जाईल. फक्त एकाच लाईनासाठी कारडेपो का करायचा?'असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. 'मेट्रोचा मार्ग हा ठरलेला आहे. त्याच्यावर सकाळ आणि संध्याकाळचा वेळी कमी जास्त गर्दी असणार आहे. त्यानुसार मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या जातात. आता ज्या मेट्रो गाड्या थांबणार आहे, त्यासाठी जागा करावी लागते. पण, पहिल्या प्रकल्पामध्ये मेट्रो उभ्या करण्यासाठी लागणारी  स्टर्लिंग लाईनचा उल्लेखच नव्हता. या स्टर्लिंग लाईन आरेच्या टोकावरती करण्यात येणार आहे' असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 'आरेमध्ये पर्यावरण वाचवले. त्याची व्यापती वाढली असून 800 एकर जागा झाली आहे. कांजूरमार्गमध्ये 40 हेक्टर जागा आहे. तर आरेमध्ये 25 हेक्टर जागा वापरणार होतो, पण कांजूरमार्गमध्ये संपूर्ण जागा ही ओसाड आहे. त्यामुळे आरेच्या जागेवर मेट्रो 3 चा कारशेड होणार होता. पण कांजूरमार्गवर 40 हेक्टर जागा असल्यामुळे मेट्रो 3, 4 आणि 6 या तिन्ही लाईनच्या कारशेड उभारू शकतो. त्यामुळे तिन्ही लाईनचे कारशेड एकाच ठिकाणी उभारू शकतो. याच कारशेडमधून मेट्रो 14 थेट अंबरनाथपर्यंत लाईन नेता येईल. जर विकास करायचा असेल तर हा योग्य नाही का? मग तुम्ही सांगा मला, जे आम्ही करतोय तो अहंकार आहे की उपयोग आहे? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी जनतेला विचारला आहे. 'मी राज्याचा मुख्यमंत्री आहे म्हणून जनतेसाठी हे काम करणारच आहे. यात चूक काय आहे. काय मी चूक करत आहे. पण, दुर्दैवाने केंद्र सरकार हायकोर्टात गेले आहे. जर खेचाखेची करायची आहे. तर बुलेट ट्रेनसाठी जगातला सर्वात महागडा भुखंड वांद्रे येथील दिला आहे. त्याच्यावर फायनान्स सेंटर हे इतर राज्यात गेला आम्ही विरोध केला नाही. परंतु, ज्या ज्या वेळी केंद्राचे इतर प्रकल्प राज्यात येतात तेव्हा जमीन दिली जाते. मग मेट्रोच्या प्रकल्पाचा वाद आपण का सोडवू शकत नाही. काही बिल्डर तिकडे गेले आहे. जर केंद्र आणि राज्याने बसून यावर तोडगा काढला पाहिजे' असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्याच्या निवेदनातील महत्त्वाची मुद्दे... -प्रत्येक पावलावर सावध राहा, असं सांगण कुटुंबप्रमुख माझं कर्तव्य आहे. -कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आपल्याला यश आलं आहे. -केंद्राकडून पैसे येण्याचे बाकी असताना आपण आत्मविश्वासानं पुढं जात आहोत. -सरकार पाडण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत, पण राजकीय हल्ले परतवत सरकारने एक वर्ष पूर्ण केलं. -नवीन वर्षाच स्वागत करताना सावध राहा. -सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन -नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता वाटत नाही. -पुढील सहा महिने मास्क लावणं अनिवार्य आहे. -लस येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत मास्क लावणं बंधनकार आहे. -सर्वानी कोरोना निर्बंधांचे पालन करत काळजी घ्यावी. -स्कायवॉक बनवताना दूरदृष्टी नसल्याने काही स्कायवॉक तोडावे लागत आहेत. -विकास सर्वगामी आणि दूरद्ष्टीचा असायला हवा. तात्कीलन विकासाला अर्थ नाही. -प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत प्रकल्पांना रोखणे कद्रूपणा आहे. -पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणतात, आम्हीही जनतेचे सेवक आहोत. -कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारणे योग्य नाही. -मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी होणारा वाद जनतेच्या हिताचा नाही -जनतेची जागा बिल्डरच्या घशात न घालता ती जनतेसाठीच वापरण्यात येत आहे. -पुढील 50, 100 वर्षांचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी माझी आहे. -कांजूरला 3, 4 आणि 6 या मेट्रोच्या तीन लाईन्ससाठी कारशेड करू शकतो. -पहिल्या मेट्रो प्रकल्पात स्टर्लिंग लाईनचा उल्लेख नव्हता -आपण आरेचे जंगल वाचवले आहे. संजय गांधी हे शहरात बनवलेले जंगल आहे. -मेट्रोसाठी कालांतराने आरेचे जंगल नष्ट झाले असते. -मी माझ्या मुंबईसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी अहंकारी आहे. -मेट्रो कांजूरमार्गबाबत सध्या वाद घालण्यात येत आहे. -विकास करताना अतिघाई टाळणे गरजेचे असते. -या सर्व गोष्टींमुळे प्रकल्पाचा खर्च वाढतो. नवीन गोष्टी येतात, त्या स्वीकाराव्या लागतात. -एखादा प्रकल्प सुरू केला की त्याला विरोध होतो, त्यात काही बदल करावे लागतात. -आधीचीच कामे पुढे नेत असल्याची टीका होते, मात्र कामाला स्थगिती द्यायची की पुढे न्यायची ते ठरवा -विकासकामे कुठेही थांबलेली नाहीत. -शाळा सुरू करण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. -अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचे डागडूजी करत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. -राज्यातील गड, किल्ले, मंदिरे ही आपली संपत्ती आहे. -कोरोना महामारीच्या काळातही आपण अनेक सांमजस्य करार केले आहे. -आर्थिक चणचण असल्याचे मान्य करावे लागेल. -समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आहे. राज्याचा विकास झाला आहे. -या सर्व संकटाचा सामना करत सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. -राजकीय हल्ले परतवत, आरोग्य संकटाशी मुकाबला करत राज्याचा विकास केला. -लग्नसमारंभात सहभागी होताना काळजी घ्या, मास्क काढू नका. -लग्नाचे आमंत्रण आप्तस्वकीयांना द्या, कोरोनाला देऊ नका. -नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने सावध राहावे. -प्रत्येकाने कोरोनाबाबतचे निर्देश पाळण्याची गरज आहे. -राज्यात सध्या रात्रीच्या कफ्यूची गरज नाही. -आपण सुरक्षा आणि काळजी घेत हळूहळू गोष्टी सुरू करत आहोत. -लंडनमध्ये कोरोनाने आपले स्वरुप बदलले आहे. -लंडनमध्ये लॉकडाऊनचे कठोर निर्बंध घालण्यात आले आहे. -जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. -कोरोनाची लस आल्यानंतरही आपल्याला मास्क घालणे आवश्यक आहे. -कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन केल्यास आपण कोरोनाला रोखू शकतो. -उन्हाळा आणि पावसाळ्यात येणाऱ्या साथीचे आजार पसरण्यास आपण पायबंद घातला. -आता सर्व गोष्टी हळूहळू सुरू होत आहे. -आपण सांगितलेल्या सूचनांचे जनतेने पालन केल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आहे. -आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे.
First published:

पुढील बातम्या