Home /News /maharashtra /

सुप्रिया सुळेंचं 'ते' वक्तव्य अत्यंत बालिश, भाजप आमदारानं डागली तोफ

सुप्रिया सुळेंचं 'ते' वक्तव्य अत्यंत बालिश, भाजप आमदारानं डागली तोफ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका आहे.

    सोलापूर, 29 नोव्हेंबर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका आहे. सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) लोकसभेच्या सदस्य असून त्यांनी अशा प्रकारचं बालिश वक्तव्य करणं चुकीचं आहे, अशी सणसणीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केली आहे. तसेच पुणे काय देशाच्या बाहेर आहे का? असा सवाल देखी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी सोलापुरात पत्रकारांना संबोधित करताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षणापेक्षा कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरण महत्त्वाचं वाटतं, असा टोलाही आमदार पडळकर यांनी लगावला. हेही वाचा...मांत्रिकानं सांगितलं सूनेना होणार नाही मूलबाळ, सासरच्या लोकांकडून विवाहितेचे हाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या शपथेचा भंग केला... दुसरीकडे, आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर अनेक मुद्द्यांवरुन सडकून टीका केली. सरकारला एक वर्ष पूर्ण झालं तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे, हे देखील सांगता आलं नाही. सरकारनं कोणतेही आश्वासन पूर्ण केलं नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला. मग ते दसरा मेळावा असो किंवा परवाची त्यांची ‘सामना’ची मुलाखत असो. तुम्ही संविधान तरी मानता का?, असा सवाल देखील आमदार पडळकर यांनी उपस्थित केला आहे. देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. महाराष्ट्राला जे दिलं ते केंद्र सरकारने दिलं. राज्य सरकारने काय मदत केली ते महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं सांगावे, असा प्रतिसवाल पडळकर यांनी केला. पत्रकार अर्णव गोस्वामी प्रकरणात लाखो रुपये देऊन वकील लावता येतो. मात्र, मराठा आरक्षणाची कागदपत्रे वकीलांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. कंगनाच घर पाडणं महत्त्वाचं वाटत मात्र मराठा आरक्षण संदर्भात एक बैठक घेता येत नाही, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. कोरोना लसची निर्मिती आणि उत्पादनाबाबत तेथील शास्त्रज्ञांशी चर्चा केली. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका केली होती. 'दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं', असा टोला लगावला होता. हेही वाचा...संजय राऊत का शरद पवार यांचे वकीलपत्र घेतात, सुधीर मुनगंटीवारांनी फटकारलं 'एक लाख कोटींच्यावर गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच शोधली', अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला होता. त्याला भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: PM Naredra Modi, Supriya sule

    पुढील बातम्या