Home /News /maharashtra /

दसऱ्यालाच शिमगा करून टाकला, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

दसऱ्यालाच शिमगा करून टाकला, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

'164 जागा लढवल्या त्यापैकी 34 जागा भाजपचे उमेदवार घेऊन लढला.  पंढरपूरला उमेदवार बाहेरून आणला म्हणता. जरा तुमची यादी बघा'

'164 जागा लढवल्या त्यापैकी 34 जागा भाजपचे उमेदवार घेऊन लढला. पंढरपूरला उमेदवार बाहेरून आणला म्हणता. जरा तुमची यादी बघा'

'164 जागा लढवल्या त्यापैकी 34 जागा भाजपचे उमेदवार घेऊन लढला. पंढरपूरला उमेदवार बाहेरून आणला म्हणता. जरा तुमची यादी बघा'

    कोल्हापूर, 15 ऑक्टोबर : शिवसेनेचे (shivsena) पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ((uddhav thackeray ) यांनी दसरा मेळाव्यातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर, 'शिमगा अजून लांब असल्याचे त्यांच्या लक्षात नाही आलं, त्यामुळे दसऱ्यालाच उद्धव ठाकरे यांनी शिमगा केला' असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला आहे. (uddhav thackeray dasara speech 2021) कोल्हापूरमध्ये (kolhapur) पत्रकार परिषद घेऊन चंद्रकां पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर जोरदार टीका केली आहे. राज्यावर अस्मानी संकट आले आहे. मराठवाड्यातला शेतकरी हवालदील झाला आहे.  राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. राज्य सरकारने जी मदत जाहीर केली आहे.  जे दहा हजार कोटी दिल्याची घोषणा केली आहे, त्याची फोड करा. महाराष्ट्रात दोन दोन वादळ आली आणि महिलांवर अत्याचार होतात त्याच काय? असा सवाल पाटील यांनी केला. नोराचा क्रॉप टॉपमध्ये हॉट बेली डान्स पाहून चाहते क्लिन बोल्ड; VIDEO VIRAL 'शिमगा अजून लांब असल्याचे त्यांच्या लक्षात नाही आलं, त्यामुळे दसऱ्यालाच उद्धव ठाकरे यांनी शिमगा केला. जेवढा म्हणून भाजपावर शिमगा करता आला तेवढा केला. 164 जागा लढवल्या त्यापैकी 34 जागा भाजपचे उमेदवार घेऊन लढला.  पंढरपूरला उमेदवार बाहेरून आणला म्हणता. जरा तुमची यादी बघा, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 'जे तुम्ही केलं ते तुम्ही विसरलात. स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कुठं होतात. संघ वाढवता वाढवता डॉ. हेगडेवार यांनी काही वर्षे संघ स्थगित ठेवला. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली तेव्हा तुम्हीच अडजेसमेंट केली. अरबी समुद्राटील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले?' असा सवालही पाटील यांनी विचारला. 'आज भाषणात खूप हिंदुत्व आठवलं. सहकारी पक्षांना विचारलं का? महाराष्ट्र शिव आघाडी केली होती. मात्र तेही बदलले. बाबरी मशfद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का? बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली. राम मंदिर तुम्ही बांधलं का? जर तुम्हाला विचाराची चाड होती तर तुम्ही कुणाबरोबरच गेला नसता, ज्यांनी हिंदुत्वाला विरोध केला त्यांच्या बरोबर गेला, अशी टीकाही पाटील यांनी केली. 'उद्या 2 वर्ष होतील, सरकार पाडूनच दाखवा' उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण 'रुपाली चाकणकर यांनी आपल्या अवकातीत राहावं.माझी लायकी आणि आवाका पाहण्यासाठी मोदी आणि शहा समर्थ आहेत. उल्लेख करताना मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं.  ती टोपी कोणाला बसली असेल तर मला माहिती नाही, भाजपाला सत्तेत येण्याची घाई नाही', असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या