मुंबई, 15 ऑक्टोबर : ‘उद्या हक्काच्या या सत्तेला दोन वर्ष होतील. सत्ता पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आजपण हिंमतीने सांगतो सरकार पाडून दाखवाच’ असं थेट चॅलेंज देत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांची तोफे चौफेर धडाडली. ईडीच्या कारवाईपासून ते हिंदुत्त्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. (uddhav thackeray dasara speech 2021) शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. तब्बल 53 मिनिटं उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. नेहमी प्रमाणे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो…असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. मला कल्पना आहे, आपल्याला संधी मिळाली आहे. आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही आणि आवाज दाबणारा कधी जन्माला येणार नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘आजचा हा क्षण आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. बाळासाहेबांनी ज्याची सुरुवात केली होती, तो तुमच्या साक्षीने आपण पुढे नेत आहोत. शस्त्र पुजन केल्यानंतर मी तुमच्यावर फुलं उधळली, कारण तुम्ही माझे खरे शस्त्र आहात’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही. कारण मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे. मी तुमचा भाऊ आहे, ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच. कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलं पदं काय आहे, सत्ता तरी काय आहे, सत्ता येईल परत जाईल आणि पुन्हा येईल, पण कधी आहे मी कधीही अंहकार हा डोक्यात जाऊ देऊ नको, तू नेहमी जनतेशी नम्र राहा, जोरजबरदस्तीने काही मिळवता येत नाही, ते नम्र राहुनच मिळावे लागतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘सकाळी संघाचा मेळावा झाला, मी जे काही बोलतोय याचा अर्थ असा नाही की, मी मोहन भागवत यांच्यावर टीका करत नाही. तुमचीच माणसं जर हे ऐकत नसतील तर ही मेळाव्याची थेरं करायची कशाला. हल्ली विचारांचं पायपोस कुणाला राहिलं नाही. मोहन भागवत यांचे विचार काय आहे तर आपले पूर्वज हे एकच होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे का? एकीकडे तुम्ही हिंदूत्व म्हणजे, आम्ही कुणाचा द्वेष मत्सर करत नाही, असा विचार तुम्ही देताय पण दिवसाढवळ्या जे दिसतंय, ते मोहन भागवत तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. ‘आमचं हिदुत्व म्हणजे, राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी सांगितलं आहे, माणूस म्हणून पहिला जन्माला येत असतो, घरात असल्यावर माणूस असतो आणि जेव्हा तो घरातून बाहेर पडतो तेव्हा देश हा माझा धर्म आहे म्हणून वाटचाल करतो. त्यावेळी जर कुणी आपल्या धर्माची मस्ती घेऊन वाटेत येत असेल तर आम्ही कडवट हिंदू म्हणून उभं राहणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. ‘हिंदू राष्ट्र हा संघ जेव्हा शब्द वापरतो. तेव्हा त्यामध्ये सत्तापिपासूपणा नसतो, त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते. सत्तेसाठी संघर्ष करत असताना विवेक वापरावा, वैचारिक लढा हवा, युद्ध नको, आता तुमच्या वर्गातून जी माणसं बाहेर पडली आहे, त्यांनी सत्ता काबिज केली आहे. त्यांना एकदा शिकवणी लावा. सध्या जो काही खेळ चालू आहे, सर्व काही करायचं आहे पण मला सत्ता हवी आहे. सत्तेचं व्यसन हे एक अंमली प्रकार आहे आहे. अगदी बाजार उद्यान समित्यापासून ते लोकसभेपर्यंत माझ्या अंमलाखाली पाहिजे, हा सुद्धा अंमली प्रकार आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
‘राजनाथ सिंह हे मध्यंतरी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल बोलले. मुळात सावरकर आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का? असा सवालच उद्धव ठाकरेंनी विचारला. तसंच, ‘महिलांवर अत्याचार वाढत आहे. मी दसऱ्या मेळाव्यात बोललो होते, ‘माय मरो आणि गाय जगो’ हे हिंदुत्त्व नाही. यावर वाद झाला. मग हिंदुत्व म्हणजे काय आहे, कुणाकडून हिंदुत्व शिकायचं? आणि कुणाला शिकवायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही, आजच जर हे सत्य आहे, तेव्हा हिंदूत्वाला धोका होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे उभे राहिले होते. त्यावेळी अनेकांनी धमक्या दिल्या उडवून टाकू, ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला शिवून जाईल तो रंग देशातून पुसून टाकू असा इशारा बाळासाहेबांनी दिला होता, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. पाकिस्तानचा ‘विराट कोहली’; ‘बॉल बॉय’ ते पाकिस्ताचा कॅप्टन… थक्क करणारा प्रवास ‘तेव्हा तुमच्यासोबत होतो तेव्हा तुम्हाला शिवसैनिक चालत होता. कुणाच्या कुटुंबावर पत्नीवर, मुलांवर बायकांवर खोटे आरोप करणे हा नामर्दपणा आहे. हे हिंदुत्व नाही. कुणाच्या आडून हल्ले करायचे असेल. छापा आणि काटा काय असतो हे सांगितलं. पण अजून काटा तुम्हाला टोचाला लागला नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. ‘देशाचा अमृत महोत्सव सुरू आहे. तेव्हा महाराष्ट्र पुढे होता, पंजाब, बंगाल पुढे होता. बंगालमध्ये ममतादीदींनी करून दाखवली आहे. कुणापुढे न झुकण्याचे ममतादीदींनी दाखवून दिली आहे. कुणापुढे न झुकण्याचे दिल्लीला दाखवून देण्याची वेळ आली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. ‘सत्तापिपासूपणा किती, दोन पोट निवडणुका झाल्यात. एक पंढरपूरची झाली. पण प्रत्येक ठिकाणी कुबड्या लागत आहे. जगातला मोठा पक्ष म्हणे आणि त्यांच्याकडे एक उमेदवारही नाही. सर्व उमेदवार आयात करून निवडणूक लढवावी लागत असते, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. मृत्यूशी झुंज देतोय ‘हा’ क्रिकेटर; ब्रेन ट्यूमरमुळे आयसीयूमध्ये दाखल ‘मधल्या काळात राज्यपालांनी मला एक पत्र लिहिले होते. महिलांवर अत्याचार वाढत आहे. त्या घटना संतापजनक आहे. त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. ज्या घटनेबद्दल त्यांनी पत्र लिहिले त्या प्रकरणातील आरोपीला लगेच अटक केली. त्याला फासावर लटकवल्याशिवाय सोडणार नाही. त्यांनी लगेच दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याची सूचना केली. मी म्हटलं मोदींजींना सांगून देशाचं संसदेचं अधिवेशन घेऊन तमाम देशातील खासदार तिथे येथील आणि बोलतील. उगाच तोंडाच्या वाफा काढून फायद्या नाही. पण घटना थांबल्या पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे, असं म्हणत राज्यपालांनाही उद्धव ठाकरेंनी खडेबोल सुनावले. ‘महाराष्ट्रकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जात आहे. एखादी घटना घडली की लोकशाहीचा गळा घोटला म्हणून बोंब मारता मग उत्तर प्रदेशमध्ये काय लोकशाहीचा मळा फुलला आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

)







