नोराने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केला होता पण तिने तो अपलोड केल्याच्या काही वेळानंतर डिलीट केला होता. फॅन पेजने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे. नोराने ब्लू शॉर्ट्ससह क्रॉप टॉप घातला आहे. नोराने असे अनेक डान्स व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. वाचा : ED कार्यालयात पोहोचली अभिनेत्री नोरा फतेही; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात होणार चौकशी नोरा बॉलिवूडची डान्सिंग क्वीन आहे, यात काहीच शंका नाही. नेरा तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने आणि बुद्धीने म्हणजे हाजिर-जबाबीपणामुळे प्रेक्षकांना प्रभावित करते. नोराच्या कामाबद्दल बोलायचे तर की 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात शेवटची दिसली होती. लवकरच ती 'सत्यमेव जयते 2' चित्रपटात जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. वाचा : 'जावेद यांच्याशी भांडण झाल्यावर करते एक काम', शबाना आझमींनी सांगितलं सुखी संसाराचे रहस्य यासोबतच आज माध्यमांमध्ये नोराचे नाव एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. नोरा फतेही आज ईडी कार्यालयात पोहोचली होती. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला आज दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे सगळीकडे नोराचे नाव चर्चेत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Nora fatehi