मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सेना-भाजप युतीबद्दल फडणवीसांकडून चूक झाली का? चंद्रकांत पाटलांचा खुलासा

सेना-भाजप युतीबद्दल फडणवीसांकडून चूक झाली का? चंद्रकांत पाटलांचा खुलासा

 'देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप युती न झाल्याबद्दल चूक झाल्याचं आपल्याकडे म्हटलं होतं, असा दावा विक्रम गोखले यांनी केला होता'

'देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप युती न झाल्याबद्दल चूक झाल्याचं आपल्याकडे म्हटलं होतं, असा दावा विक्रम गोखले यांनी केला होता'

'देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप युती न झाल्याबद्दल चूक झाल्याचं आपल्याकडे म्हटलं होतं, असा दावा विक्रम गोखले यांनी केला होता'

नवी मुंबई, 14 नोव्हेंबर : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram) यांनी शिवसेना (shivsena) आणि भाजपने (bjp) युती करावे असे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजपमधून प्रतिक्रिया आली आहे. 'आम्ही त्यावेळी उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती घ्या असे म्हटलं होतं. पण आमच्याकडून कुठलीही चूक वाटत नाही. आम्ही एकट्याने निवडणूक लढवतो' असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी म्हटलं आहे.

पनवेलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विक्रम गोखले यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

'बाळासाहेबांवरील प्रेम हे राजकीय आणि बेगडी प्रेम नाही. शिवसेना भाजपा एकत्र येण्यासाठी तर बिल्कुल नाही, आम्हाला एकत्र येण्याची इच्छाच नाही. जसा यांचा व्यवहार यांच्यासोबत काम करण्याची इच्छाच नाही. ज्यावेळी मुंबईमध्ये दंगली घडल्या होत्या त्यावेळी 15 -15 दिवस शिवसेना आम्हाला सुरक्षित ठेवायची त्या शिवसेनेत आणि या शिवसेनेत फरक आहे. आम्हाला शिवसेनेसोबत सरकार करायचं नाही आम्हाला शिवसेनेसोबत निवडणुका लढवायच्या नाहीत.

दूध देत नाही म्हणून म्हशीलाच पोलीस ठाण्यात घेऊन आला शेतकरी; अधिकारीही हैराण

'विक्रम गोखले यांनी शिवसेना आणि भाजपची युती व्हायला पाहिजे होती. फडणवीस यांनी ही चूक झाल्याचे म्हटलं होतं. याबद्दल पत्रकारांनी चंद्रकांत पाटील म्हणाले की,  'या देशाच्या लोकशाहीची सुंदरता हीच आहे की कोणीही काहीही बोलू शकतो. विक्रम गोखले यांना जे वाटलं त्यांनी ते म्हटलं. आम्हाला आमची कुठलीही चूक वाटत नाही. आम्ही त्यावेळी उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती घ्या असे म्हटलं. त्यामुळे आमची कुठलीही चूक नाही.'

MUDM Recruitment: महाराष्ट्र नागरी विकास मिशन स्वच्छ महाराष्ट्र अभियान इथे भरती

कंगना रनौत ने हे म्हणायला हरकत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आम्हाला स्वातंत्र्याचा अनुभव यायला लागलाय. 1947 साली भेटलेल्या स्वतंत्र्याबद्दल त्यांनी टिप्पणी करण्याचं कारण नाही त्यांना तो अधिकार नाही, असं पाटील म्हणाले.

First published:
top videos