मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशकात भाजपला धक्का; बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला; आज होणार पक्षप्रवेश

नाशकात भाजपला धक्का; बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला; आज होणार पक्षप्रवेश

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता त्याच नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून भाजपला जोरदार धक्का देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता त्याच नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून भाजपला जोरदार धक्का देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता त्याच नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून भाजपला जोरदार धक्का देण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जानेवारी :  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अनेक नगरसेवक, आमदार एवढंच नव्हे तर खासदारांनी देखील ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता ठाकरे गट या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते अद्वय हिरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

आज शिवसेनेत प्रवेश    

अद्वय हिरे हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. अद्वय हिरे हे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते असून, ते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष देखील आहेत. अद्वय हिरे यांनी नुकतीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर ते आज चार वाजता उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना भवन येथे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा : निवडणूक सर्व्हेची आकडेवारी भाजपचं टेन्शन वाढवणारी; सुप्रिया सुळे म्हणतात गद्दारी...

नाशिकमध्ये ठाकरे गटाला दिलासा 

दरम्यान नाशिकमध्ये हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कारण यापूर्वी दोनदा शिंदे गटाने नाशिकमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी हे काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सामील झाले आहेत.मात्र आता अद्वय हिरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्यानं हा भाजपसाठी मोठा धक्का तर ठाकरे गटासाठी दिलासा मानला जात आहे.

First published:

Tags: BJP, Nashik, Shiv sena, Uddhav Thackeray