जालना, 28 मे : भाजप (bjp) आणि एमआयएमचं (mim) साटलोटं असून MIM भाजपची बी टीम, मनसे (mns) सी टीम तर राणा दाम्पत्य हे भाजपची डी टीम आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत MIM आणि वंचित ला 1000 कोटी रुपये दिल्याचं खळबळजनक आरोप शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार चंद्रकात खैरे (chandrakant khaire) यांनी केला.
शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित बैठकीसाठी चंद्रकांत खैरे हे जालन्यात आले होते. यावेळी बोलत असताना खैरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजप आणि एमआयएमचं साटलोटं आहे. MIM ही तर भाजपची बी टीम आहेच. आता मनसे ही सी टीम झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य हे भाजपची डी टीम झाली आहे, अशी टीका खैरे यांनी केली.
('सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; अॅक्शन, फॅमिली ड्रामा)
'ED ची चालबाजी मला माहिती आहे, त्यामुळे ED ला घाबरायचं नाही. तुम्ही किती कमावले? कुठून पैसे आले? MIM वंचितला वाटण्यासाठी आले होते. भाजपने लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि एमआयएमला 1000 कोटी रुपये वााटले होते, असा आरोपच खैरे यांनी कला.
(कायमस्वरुपी हसरा चेहरा घेऊन जन्मलं गोंडस बाळ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल)
तसंच, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा ड्रामा केला. पण हनुमान चालीसा चप्पल घालून म्हटल्यामुळे हनुमानाने राणा दाम्पत्याला 14 दिवस जेल मध्ये पाठवून दिले, असा टोला ही खैरे यांनी लगावला.
दरम्यान,रावसाहेब दानवे यांनी देखील मला चकवा दिला. मुळात केंद्रीय राज्य मंत्री असताना कार्यकर्त्या सारखी विरोधी पक्षा नेत्याच्या गाडी पुढची गर्दी हटवली, असे करायला नाही पाहिजे, शब्दांत खैरे यांनी दानवेंना टोला ही लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.