Home /News /videsh /

कायमस्वरुपी हसरा चेहरा घेऊन जन्मलं गोंडस बाळ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

कायमस्वरुपी हसरा चेहरा घेऊन जन्मलं गोंडस बाळ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

काही लहान मुलांचे क्यूट फोटो-व्हिडिओज आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतात. अशाच एका बाळाचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

    कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया), 28 मे : सोशल मीडियावर अनेक फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही लहान मुलांचे क्यूट फोटो-व्हिडिओज आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतात. अशाच एका बाळाचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. एका दुर्मीळ शारीरिक स्थितीसह जन्मलेलं एक बाळ लाखो सोशल मीडिया युझर्सच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत. त्याचं कारण म्हणजे हे बाळ कायमस्वरूपी हास्यासह (Permanent Smile) जन्माला आलं आहे. विशिष्ट शारीरिक स्थितीमुळे या बाळाचा चेहरा कायम हसरा दिसतो. डिसेंबर 2021 मध्ये ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या या मुलीचं नाव आयला समर मुचा (Ayla Summer Mucha) असं आहे. चेहरा हसरा दिसत असला, तरी या मुलीला तोंडाचा वापर योग्य रीतीने करता येण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या संदर्भातलं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. या मुलीला जन्मापासून मायक्रोस्टोमिया (Microstomia) नावाचा आजार आहे. ही एक अशी दुर्मिळ स्थिती आहे, जी तिच्या चेहऱ्याच्या सौंदर्यावर (Face Beauty) परिणाम करते. ही मुलगी नेहमीच हसत असल्यासारखी वाटते. तिचे काही फोटोज व्हायरल झाल्यानंतर ती 'टिकटॉक' आणि इंस्टाग्रामवर स्टार झाली आहे. (...तर थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंनी महावितरणच्या अधिकाऱ्याला झापले, VIDEO) आयलाच्या पालकांचं नाव क्रिस्टीना वर्चर (21 वर्ष) आणि ब्लेझ मुचा (20 वर्ष) आहे. तिच्या पालकांना डॉक्टरांनी तिच्या या दुर्मीळ शारीरिक स्थितीबद्दल माहिती दिली. आयला ही तिच्या आईच्या गर्भात असतानाच ही स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितले. "ब्लेझ आणि मला या स्थितीबद्दल माहिती नव्हती. मायक्रोस्टोमियासह जन्मलेल्या कोणालाही आजपर्यंत आम्ही पाहिलेलं नाही. त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला याबद्दल माहिती दिल्यानंतर आम्हाला खूप मोठा धक्का बसला," असं क्रिस्टीनाने न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना सांगितलं.
    क्लेफ्ट पॅलेट क्रानिओफेशिअल जर्नलमध्ये (Cleft Palate-Craniofacial Journal) 2007मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, जगभरात आतापर्यंत मायक्रोस्टोमियासह जन्मलेल्या केवळ 14 जणांची नोंद झाली आहे. मायक्रोस्टोमिया ही खूपच दुर्मीळ स्थिती आहे. आयलाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या फ्लिंडर्स मेडिकल सेंटरच्या (Flinders Medical Centre) डॉक्टर्सनी तर पहिल्यांदाच असं बाळ प्रत्यक्ष पाहिलं. सिझेरियनसाठी जाण्यापूर्वी क्रिस्टीना वर्चरच्या अल्ट्रासाउंड स्कॅनमध्ये बाळाच्या या स्थितीबद्दल कळलं नव्हतं. 'एक आई म्हणून मी कुठे चुकले, याबद्दल मी विचार करतेय. कारण मी माझ्या गर्भधारणेदरम्यान खूप सतर्क होते आणि आम्ही योग्य ती काळजी घेत होतो,’ असं क्रिस्टीना म्हणाली. दरम्यान, बाळाला मायक्रोस्टोमिया होण्यात आई-वडिलांची काही चूक नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आयलाचे आई-वडील तिचा चेहरा नीट व्हावा यासाठी शस्त्रक्रियेबद्दलची माहिती डॉक्टरांकडून घेत आहेत. हे पर्मनंट स्माईल दिसायला चांगलं वाटत असलं, तरी तिला दूध पाजण्यात अडचणी येतात. तोंडाचा आकार खूप मोठा असल्याने तसं होतं. तिला चोखण्याचं काम करण्यात अडचणी येतात. सध्या आयलाचे पालक इंस्टाग्रामवर त्यांचे अनुभव शेअर करून या दुर्मीळ स्थितीबद्दल जागरूकता (Awareness) करत आहेत. आयला जसजशी मोठी होईल तसतशी तिची स्थिती सुधारावी, यासाठी डॉक्टरही सर्जरीचा सल्ला देत आहेत.
    First published:

    पुढील बातम्या