ठाणे, 8 फेब्रुवारी : मुंब्र्याचं नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावं अशी मागणी आता होऊ लागली आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप नेते मोहित कंबोज आणि जितेंद्र आव्हाड हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मुंब्र्याचं नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावं अशी मागणी करण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ’ मुंब्रा हे एक गाव असून, त्याचं नाव मुंब्रा देवीच्या नावावरून पडलं आहे. मग तुम्ही महालक्ष्मी स्टेशनचं नाव बदलून महालक्ष्मी देवी असं करणार का?’ असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून उपस्थित केला होता. कंबोज यांचं ट्विट आव्हाड यांच्या या ट्विटला आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी उत्तर दिलं आहे. ‘मुंब्राचं नाव मुंब्रा देवी झालं तर काय समस्या आहे? यापूर्वी देखील अनेक स्टेशनचं नाव बदलण्यात आलं. तेव्हा कोणीही काही प्रश्न उपस्थित केले नाहीत. आज मी पुन्हा एकदा मागणी करतो मुंब्राचं नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावं’, असं म्हणत त्यांनी आपलं हे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
आव्हाड साहब ,
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) February 8, 2023
मुंब्रा का नाम मुंब्रा देवी हुवा तो क्या दिक्कत है ?
क्या इस मे देवी का नाम आता है इसलिये ?
इसे पहले भी कई स्टेशन के नाम बदले फिर सवाल नही खडे हुवे ।
आज मेरी फिर से मांग है @mieknathshinde जी और @Dev_Fadnavis जी से मुंब्रा के बजाय मुंब्रा देवी नाम होना चाहिये ! https://t.co/0PEUY5C2nb
कंबोज, आव्हाड आमने-सामने? मुंब्र्याचं नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावं अशी मागणी आता होऊ लागली आहे. मात्र या मागणीवर प्रश्न उपस्थित करणारं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ‘महालक्ष्मी स्टेशनचं नाव बदलून महालक्ष्मी देवी असं करणार का?’ असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. आव्हाड यांच्या ट्विटला मोहित कंबोज यांनी उत्तर दिल्यानं हा वाद आता आणखी तापण्याची शक्यता आहे.