अखेर राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम झालाच! पंढरपुरात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी

अखेर राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम झालाच! पंढरपुरात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी

राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 02 मे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur Assembly by-election 2021) पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे  (Samadhan Awtade) 3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत 'तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो' असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.

Beed News : भावकीच्या वादातून तरुणावर हल्ला, रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार

समाधान आवताडे यांनी 3716 मतांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. नंतर याचे रुपांतर विजयात झाले आहे.

IPL 2021: 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नरवर 'ही' नामुश्की का आली?

भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये कडवी झुंज सुरू होती. कधी राष्ट्रवादी पुढे तर कधी भाजप आघाडी घेत होती. एकूण 38 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली.  7 व्या फेरीपासूनच समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली. अखेरच्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना विजयी घोषित करण्यात आले. राष्ट्रवादीने पंढरपूरमध्ये झालेला पराभव स्विकारला आहे. हा धनशक्तीचा विजय असल्याची टीकाही राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी यांनी केली.

आतापर्यंतचा निकाल

 पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर

- दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं

- तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे

- 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर

- 5 फेऱ्या पूर्ण  भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर.

- 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 100मतांनी आघाडीवर.

- 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2295मतांनी आघाडीवर

- 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1503मतांनी आघाडीवर.

- 12 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1409मतांनी आघाडीवर

- 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1411 मतांची आघाडीवर

- 17 व्या फेरी अखेर ९०१ मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

- 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1209 मतांनी आघाडीवर

- 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1022मतांनी आघाडीवर

- 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे  3486मतांनी आघाडीवर

- 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3908 मतांनी आघाडीवर

- 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5807  मतांनी आघाडीवर

- 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6200मतांनी आघाडीवर

- 36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4256  मतांनी आघाडीवर

- भाजपचे समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी

Published by: sachin Salve
First published: May 2, 2021, 5:26 PM IST

ताज्या बातम्या