मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नरवर 'ही' नामुश्की का आली?

IPL 2021: 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नरवर 'ही' नामुश्की का आली?

सनरायझर्स हैदराबादनं (SRH) त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय रविवारी घेतला. हैदराबादच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन असलेल्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) टीममधून वगळण्यात आलं.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 2 मे : सनरायझर्स हैदराबादनं (SRH) त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय रविवारी घेतला. हैदराबादच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन असलेल्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) टीममधून वगळण्यात आलं. वॉर्नरनं 2014 साली हैदराबादच्या टीममध्ये पदार्पण केलं. तेंव्हापासून आज पहिल्यांदाच वॉर्नरला हैदराबादनं टीममधून वगळण्यात आलंय. डेव्हिड वॉर्नर खेळण्यासाठी उपलब्ध आहे, आणि हैदराबादच्या अंतिम 11 मध्ये नाही, हे पहिल्यांदाच घडलं आहे. शनिवारीच मिळाले होते संकेत डेव्हिड वॉर्नरची हैदराबादनं शनिवारी कॅप्टन म्हणून हकालपट्टी केली. केन विल्यमसन (Kane Williamson) याची वॉर्नरच्या जागी निवड करण्यात आली. त्याचवेळी राजस्थान विरुद्ध टीम नव्या विदेशी खेळाडूंच्या कॉम्बिनेशनसह उतरणार असल्याची माहिती हैदराबादनं दिली होती. केन विल्यमसन आता कॅप्टन आहे. जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि राशिद खान (Rashid Khan) हे दोघंही सध्या फॉर्मात आहेत. त्यामुळे चार विदेशी खेळाडूच्या कोट्यातील फक्त वॉर्नरची जागा धोक्यात आली होती. वॉर्नरच्या जागी हैदराबादनं स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर मोहम्मद नबीची (Mohammad Nabi) हैदराबादनं टीममध्ये निवड केली आहे. नबी हा अफगाणिस्तान अनुभवी ऑलराऊंडर आहे. तो उत्तम ऑफ स्पिनर असून उपयुक्त बॅट्समन आहे. हैदराबादच्या मिडल ऑर्डरला स्थिरता देण्यासाठी हैदराबादनं टीममध्ये निवड केली आहे. IPL 2021: मुंबईविरुद्ध खळ्ळ-खट्याक, थोडक्यात वाचले खेळाडू! वॉर्नरवर नामुष्की का आली? सनरायझर्स हैदरबादच्या खराब कामगिरीचं खापर कॅप्टन म्हणून सर्वात प्रथम वॉर्नरच्या डोक्यावर फुटलं. या सिझनमध्ये हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यांचा पहिल्या 3 मॅचमध्ये सलग पराभव झाला. तसंच पहिल्या 6 पैकी फक्त 1 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. वॉर्नरनं या काळात बॅट्समन म्हणूनही फार कमाल केली नाही. 6 मॅचमध्ये त्यानं 2 अर्धशतकासह 193 रन केले. त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 110.18 इतका होता. एक आक्रमक बॅट्समन आणि मॅच जिंकून देणारा कॅप्टन या दोन्ही बाबतीमध्ये वॉर्नर फेल गेल्यानंच त्याच्यावर 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच टीमच्या बाहेर बसण्याची वेळ आली आहे.
First published:

Tags: David warner, IPL 2021, SRH

पुढील बातम्या