जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भावकीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने केले वार

भावकीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने केले वार

भावकीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने केले वार

Beed crime news भावकीच्या वादातून बीडमध्ये भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ल्याचा प्रकार घडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 2 मे: बीड (Beed) तालुक्यातील येळंब घाट परिसरात भर रस्त्यावर दुपारी एका तरुणावर धारदार शस्त्राने (attack with sharp weapon) जीवघेणा हल्ला झाला. यातील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तिघांविरोधात नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed Crime News) भावकीच्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. (वाचा- पंढरपूरकरांकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’, भाजप विजयाचा उंबरठ्यावर! ) जखमी तरुणाचं नाव बबलू पवार असं आहे. बबलू पवार याच्यावर येळंब घाट परिसरामध्ये रसत्यात अडवून भर दुपारी हल्ला करण्यात आला होता. भावकीमध्ये असलेल्या मधूकर पवार यांच्यावर या प्रकरणी आरोप करण्यात आला आहे. बबलू पवार यांच्या शरिरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यानंतर तब्बल एक ते दीड तास रस्त्याच्या कडेला तरुण तडफडत होता. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पाहिले. पण भांडणाच्या दहशतीमुळं कोणीही त्याल्या मदतीसाठी सरसावलं नाही. त्यानंतर पत्रकरांनी रुग्णवाहिकेला फोन केला आणि त्याला उपचारासाठी नेकनूरला पाठवला. त्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढं बीडला रुग्णाला हलवण्यात आलं आहे. बबलू पवार याची प्रकृती गंभीर असून बीड येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. (वाचा- West Bengal Result : ममतादीदींचा शानदार विजय, शरद पवारांनी केलं अभिनंदन, म्हणाले ) दरम्यान, या घटनेनंतर रात्री मारहाण करणाऱ्या आरोपी मधुकर पवार यांच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. यावेळीही पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत कोणीही ट्रॅक्टर विझवण्यासाठी किंवा अगदी ट्रॅक्टरच्या जवळच बांधलेल्या जनावरांना वाचवण्यासाठीही पुढं गेलं नव्हतं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर जनावरांना बाजूला काढून स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला लागलेली आग विझवण्यात आली. भावकीच्या वादातून बबलू पवार याच्यावर हल्ला आणि त्यानंतर ट्रॅक्टर जाळल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पण दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात