मुंबई, 2 ऑक्टोबर : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे (Chota rajan) बंधू दीपक निकाळजे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (RPI) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असंही बोललं जात होतं. रिपब्लिकन पार्टी आठवले गटाने काल दिलेलं हे तिकीट आज मागे घेतलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधून दीपक निकाळजे निवडणूक लढवणार होते. आता या जागेवर रामदास आठवलेंनी नवा उमेदवार दिला आहे. डॉनच्या भावाला तिकीट दिलं अशा बातम्या आल्यानं त्यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा आहे. मित्रपक्षासाठी भाजपने किती आणि कोणत्या जागा सोडल्या हे ‘रिपाइं’ची यादी जाहीर झाल्यामुळे उघड झालं. रिपाइंला मिळालेल्या 6 जागांपैकी दीपक निकाळजे (deepak nikalje) यांना फलटणची जागा देण्यात आली होती. दीपक निकाळजे लढणार होते कमळाच्या चिन्हावर रिपाइंचे सर्व उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असंही जाहीर करण्यात आलं. हे वाचा - मनसेची 32 जणांची तिसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार नाही! दीपक निकाळजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीका केली. या उमेदवारीची घोषणा होताच नवाब मलिक यांनी ‘मोदींच्या टीम मध्ये दाऊदचा माणूस आहे’, अशी टीका केली. वाचा- अडीच कोटींच्या कारमधून फिरतो या नेत्याचा नातू, वयापेक्षा जास्त कोटींची संपत्ती ‘गुजरातमध्ये जसं गुंडांना पोसलं जात तसं महाराष्ट्रमध्येही होत आहे’, असंही ते म्हणाले होते. अखेर या टीकेमुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं. आता दीपक निकाळजेंच्या जागी दिगंबर आगाव यांना तिकीट देण्यात आलं आहे. मानखुर्दसह 6 जागा आठवलेंकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. वाचा - भाजपची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे, विनोद तावडे वेटिंगवरच त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण ;सोलापुरातील माळशिरस ; विदर्भात भंडारा ; मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव; परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइंला सोडण्यात आल्या असल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बांद्रा संविधान निवासस्थानी पत्रकार परिषदेत केली आहे. रिपाइंच्या जागा आणि उमेदवार मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई) - गौतम सोनावणे फलटण (सातारा) : दिगंबर आगाव पाथरी (परभणी) : मोहन फड नायगाव (नांदेड): राजेश पवार माळशिरस (सोलापूर) भंडारा (विदर्भ) दरम्यान, माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याचं समजतं. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (4 ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. —————————————————————— चोर तो चोर वर शिरजोर, भररस्त्यावर महिलेनं केली पोलिसांना मारहाण, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







