संदीप राजगोळकर,(प्रतिनिधी) कोल्हापूर,3 ऑक्टोबर: काँग्रेसचे सदस्य आणि कोल्हापूर शहराचे माजी महापौर डी.वाय. पाटील यांचे नातू आणि आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतूराज पाटील यांनी गुरूवारी सायकलवरुन रॅली काढत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. ऋतुराज पाटील हे संजय पाटील यांचे सुपुत्र आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर ऋतुराज पाटील हे रिंगणात उतरले आहेत. जमीन जुमला, ठेवी, गाड्या, दागदागिने अशी कोट्यवधीची संपत्ती ऋतुराज पाटील यांच्या नावे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात हाय-टेन्शन मतदार संघ म्हणून कोल्हापूर दक्षिण या मतदार संघाकडे पाहिले जाते. कारण याठिकाणी पारंपरिक शत्रू असलेले महाडिक गट आणि सतेज पाटील गट समोरासमोर आहेत. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेले अमल महाडिक यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करत मोठा धक्का दिला होता. यंदा सतेज पाटील विधानपरिषदेवर आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्यात लढत होत आहे. 4 लाखांची बाईक तर अडीच कोटींची कार.. 29 वर्षीय ऋतुराज पाटील विवाहित आहेत. त्यांच्याकडे एकूण 34 कोटी 35 लाख 65 हजार 437 रुपयांची संपत्ती आहे. 4 लाखांची दुकाटी बाईक आहे. भारदस्त पोर्शे आणि फोर्ड या दोन कार ऋतुराज पाटील यांच्या ताफ्यात आहेत. पोर्शे या कारची किंमत तब्बल 2 कोटी 62 लाख 33 हजार 257 इतकी आहे. तर फोर्डची किंमत 27 लाख रुपये आहे. ऋतुराज पाटील यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आलिशान कार.. दुकाटी –4 लाख 1 हजार 320 सुझुकी बाईक –55 हजार 787 पोर्शे कार –2 कोटी 62 लाख 33 हजार 257 फोर्ड –27 लाख सोने दागिने सोने –4 लाख 65 हजार 131 हिरे –4 लाख 60 हजार 635 शेतजमीन, घर, इमारती एकूण बाजारमूल्य –11 कोटी 47 लाख 7 हजार 297 उसणे दिलेले पैसे/दिलेले कर्ज हॉटेल सयाजी –11 लाख 64 हजार 840 डी वाय पी हॉस्पिटल –42 लाख 72 हजार गजानन अॅग्रो फार्मर –13 कोटी 95 लाख 27 हजार 999 भाऊ पृथ्वीराज पाटील –1 कोटी 72 लाख 60 हजार ऋतुराज पाटील यांची संपत्ती ठेवी, रोख रक्कम, शेअर्स –22 कोटी 88 लाख 58 हजार 140 घर, जमीन जुमला– 11 कोटी 47 लाख 07 हजार 297 एकूण संपत्ती -34 कोटी 35 लाख 65 हजार 437 VIDEO:नाथाभाऊ हे चुकीचं आहे, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







