भाजपची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे, विनोद तावडे वेटिंगवरच

भाजपची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे, विनोद तावडे वेटिंगवरच

  • Share this:

मुंबई,3 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरूवारी आपल्या उमेदवारांची तिसरी जाहीर केली. मात्र, तिसऱ्या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्चशिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची नावे न नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या चार जणांचा समावेश...

भाजपच्या तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे आणि चंद्रकांत बावनकुळे यांचा यादीमध्ये समावेश नाही. शिरपूरमधून काशिराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीमधून परिणय फुके आणि मालाड (पश्चिम) रमेश ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यत भाजपने 143 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

खडसेंचा पत्ता कट..

भाजपच्या तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसे यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार हे आता निश्चित समजले जात आहे. आपल्याला तिकीट मिळणार नाही हे समजल्याने खडसेंनी गुरूवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊसवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजपकडून अद्यापही उमेदवारी जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. आमदार संजय सावकारे सुद्धा यावेळी गहिवरले. खडसे म्हणाले, मी शरद पवारांच्या संपर्कात नाही. गेल्या तीन वर्षात शरद पवारांशी माझी भेट झालेली नाही. केवळ अफवा सोडण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितले. खडसे यांच्या बंगल्याबाहेर काही कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा इशाराही दिला असून एकनाथ खडसे यांनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे कार्यकर्ते शांत झाले.

खडसेबाबत पवारांनी केला हा गौप्यस्फोट..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ED प्रकरणानंतर आता आक्रमक झालेत. आज ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय आणि एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले एकनाथ खडसे हे गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात आहेत. मात्र त्यांचे पक्षात येण्याबाबात अजुन निश्चित काही सांगता येत नाही. ते काय पर्याय शोधतील हे आत्ताच काही सांगता येत नाही. पर्याय हा लगेच तयार होत नसतो. पवारांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

भाजपची तिसरी यादी...

1)शिरपूर- काशिराम पावरा

2) रामटेक- मल्लिकार्जुन रेड्डी

3) साकोली- परिणय फुके

4) मालाड पश्चिम- रमेश ठाकूर

भाजपची दुसरी यादी

1) साक्री - मोहन सुर्यवंशी

2) धामनगाव रेल्वे - प्रतापदादा अडसाड

3) मेळघाट - रमेश मावस्कर

4) गोंदिया - गोपाळदास अग्रवाल

5) अहेरी - अमरिश राजे आत्राम

6) पुसद - निलय नाईक

7) उमरखेड - नामदेव ससाणे

8) बागलान - दिलीप बोरासे

9) उल्हासनगर - कुमार आयलानी

10) बारामती - गोपीचंद पडळकर

11) मावळ - संजय भेगड

12) केज - नमिता मुंदडा

13) लातूर (शहर) - शैलेश लाहोटी

14) उदगीर - डॉ. अनिल कांबले

भाजपची पहिली यादी

1) नागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीस

2) कोथरूड - चंद्रकांत पाटील

3) नंदूरबार - विजयकुमार गावित

4) नवापूर - भारत गावित

5) रावेर - हरीभाऊ जावळे

6) भुसावळ - संजय सावकारे

7) अकोला (प.) - गोवर्धन शर्मा

8) अकोला (पू.) - रणधीर सावरकर

9) जामनेर - गिरीश महाजन

10) जळगाव जामोद - संजय कुटे

11) शहादा - राजेश पडवी

12) जळगाव शहर - सुरेश भोळे

13) सिंदखेडा - जयकुमार रावल

14) धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती बदाणे

15) अमळनेर - शिरीष चौधरी

16) चाळीसगाव - मंगेश चव्हाण

17) माण - जयकुमार गोरे

18) तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील

19) अकोले - वैभव पिचड

20) राहुरी - शिवाजीराव कर्डिले

21) औसा - अभिमन्यू पवार

22) वांद्रे पश्चिम - आशिष शेलार

23) नाशिक मध्य - देवयानी फरांदे

24) ऐरोली - संदीप नाईक

25) शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील

26) इंदापूर - हर्षवर्धन पाटील

27) अमरावती - सुनील देशमुख

28) वर्धा - पंकज भोयर

29) मूर्तिजापूर - हरीश पिंपळे

30) पुणे कँटोन्मेंट - सुनील कांबळे

31) वाशिम - लखन मलिक

32) कारंजा - राजेंद्र पटणी

33) दर्यापूर - रमेश बुंदिले

34) मोर्शी - डॉ. अनिल बोंडे

35) आर्वी - दादाराव केंचे

36) हिंगणघाट - समीर कुणावार

37) नागपूर पूर्व - कृष्णा खोपडे

38) उमरेड - सुधीर पारवे

39) हिंगणा - समीर मेघे

40) राजुरा - संजय धोत्रे

41) आमगाव - संजय पूरम

42) मलकापूर - चैनसुख संचेती

43) चिखली - श्वेत महाले

44) खामगाव - आकाश फुंडकर

45) अकोट - प्रकाश भारसाकळे

46) सावनेर - राजीव पोतदार

47) नागपूर दक्षिण - मोहन मते

48) नागपूर मध्य - विकास कुंभारे

49) नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख

50) नागपूर उत्तर - मिलिंद माने

51) अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले

52) तिरोरा - विजय रहांगदले

53) आरमोरी - कृष्णा गजभे

54) गडचिरोली - देवराव होली

55) चंद्रपूर - नाना शामकुळे

56) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार

57) चिमूर - किर्तीकुमार भांगडिया

58) वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार

59) राळेगाव - अशो उइके

60) यवतमाळ - मदन येरावार

61) आर्नी - संदीप धुर्वे

62) भोकर - बापुसाहेब गोर्ठेकर

63) मुखेड - तुशार राठोड

64) हिंगोली - तानाजी मुटकुळे

65) परतूर - बबनराव लोणीकर

66) बदनापूर - नारायण कुचे

67) भोकरदन - संतोष दानवे-पाटील

68) फुलंब्री - हरीभाऊ बागडे

69) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे

70) परळी - पंकजा मुंडे

71) गंगापूर - प्रशांत बम

72) चांदवड - राहुल आहेर

73) नाशिक पश्चिम - सीमा हिरे

74) डहाणू - पास्कल धनारे

75) विक्रमगड - हेमंत सावरा

76) भिवंडी पश्चिम - महेश चौघुले

77) मुरबाड - किसन कथोरे

78) कल्याण पूर्व - गणपत गायकवाड

79) डोंबिवली - रवींद्र चव्हाण

80) मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता

81) ठाणे - संजय केळकर

82) दहिसर - मनीषा चौधरी

83) मुलुंड - मिहीर कोटेचा

84) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर

85) चारकोप - योगेश सागर

86) घाटकोपर (प.) - राम कदम

87) गोरेगाव - विद्या ठाकूर

88) विलेपार्ले - पराग अळवणी

89) सायन कोळीवाडा - तामीळ सेल्वन

90) वडाळा (मुंबई) - कालिदास कोळंबकर

91) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा

92) बेलापूर - मंदा म्हात्रे

93) पनवेल - प्रशांत ठाकूर

94) पेन - राजीवशेठ पाटील

95) शिरूर - बाबुराव पाचर्णे

96) चिंचवड - लक्ष्मण जगताप

97) पुणे पर्वती - माधुरी मिसाळ

98) कसबा पेठ - मुक्ता टिळक

99) भोसरी - महेश लांडगे

100) वडगाव शेरी - जगदीश मुळीक

101) शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे

102) खडकवासला - भीमराव तापकिर

103) हडपसर - योगेश टिळेकर

104) कोपरगाव - स्नेहलता कोल्हे

105) सातारा- शिवेंद्रराजे भोसले

106) कराड दक्षिण - अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)

107) नेवासा - बाळासाहेब मुरकुटे

108) शेवगाव - मोनिका राजळे

109) श्रीगोंदा - बबनराव पाचपुते

110) कर्जत जामखेड - राम शिंदे

111) गेवराई - लक्ष्मण पवार

112) माजलगाव - रमेश अडसकर

113) आष्टी - भीमराव धोंडे

114) अहमदपूर - विनायक किसन जाधव-पाटील

115) निलंगा - संभाजी पाटील-निलंगेकर

116) सोलापूर शहर उत्तर - विजयराव देशमुख

117) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख

118) वाई - मदन भोसले

119) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक

120) इचलकरंजी - सुरेश हाळवणकर

121) मिरज - सुरेश खाडे

122) सांगली - सुधीर गाडगीळ

123) शिराळा - शिवाजीराव नाईक

124) जत - विलासराव जगताप

125) अंधेरी पश्चिम - अमित साटम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 06:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading