मनसेची 32 जणांची तिसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार नाही!

मनसेची 32 जणांची तिसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार नाही!

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. आतापर्यंत मनसेनं 104 उमेदवारांची यादी जाहीर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 03 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण 32 उमेदवारांची ही यादी आहे. या तिसऱ्या यादीतही राज ठाकरे यांनी आपला पुतण्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला नाही. दुसरीकडे विक्रोळीतून विनोद शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आतापर्यंत मनसेनं 104 उमेदवारांची यादी जाहीर केला आहे.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढवत आहे. आजच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. वरळीत राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात येणार आहे. तर आदित्य ठाकरे यांचे काका असलेले राज ठाकरे आपल्या पक्षाकडून वरळी उमेदवार उतरवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे. परंतु, आज तिसऱ्या यादीतही वरळी मतरसंघ टाळण्यात आला आहे.

मनसेची तिसरी यादी

भांडूप- पश्चिम संदीप जळगांवकर

विक्रोळी- विनोद शिंदे

Loading...

मुलुंड- हर्षदा राजेश चव्हाण

वडाळा- आनंद प्रभू

उरण- अतुल भगत

पिंपरी- के.के. कांबळे

मिरा-भाईंदर- हरीष सुतार

बार्शी- नागेश चव्हाण

सांगोला- जयवंत बगाडे

कर्जत-जामखेड- समता इंद्रकुमार भिसे

शिरूर - कैलास नरके

आंबेगाव - वैभव बाणखेले

खेड आळंदी - मनोज खराबी

पुणे कँटोन्मेंट - मनिषा सरोदे

उमरगा - जालिंदर कोकणे

ओवळा माजिवडा - संदीप पाचंगे

पालघर - उमेश गोवारी

विक्रमगड - वैशाली सतीश जाधव

बदनापूर - राजेंद्र भोसले

राजापूर - अविनाश सौंदाळकर

दौंड - सचिन कुलथे

पुरंदर - उमेश जगताप

भोर- अनिल मातेरे

चाळीसगांव - राकेश जाधव

वसई - प्रफुल्ल ठाकूर

डहाणू - सुनील इभान

देवळाली - सिद्धांत मंडाले

लातूर ग्रामीण अर्जुन वाघमारे

भंडारा - पूजा ठक्कर

वरोरा - रमेश राजूरकर

भुसावळ - निलेश सुरळकर

डॅशिंग नितीन नांदगावकर सेनेत

दरम्यान, विक्रोळी मतरदासंघातून मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आणि डँशिंग नितीन नांदगावकर यांना मनसेकडून तिकीट मिळणार होतं. परंतु, त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. काल त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून हातावर शिवबंधन बांधलं. नितान नांदगावकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने मनसेला जोरदार धक्का बसला आहे. गेले काही वर्षे नितीन नांदगावकरांनी बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बदडून काढत चांगलंच सरळ केलं होतं. त्यामुळे ते प्रवाशांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते.

मात्र त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी काही काळ तडीपारही केलं होतं. नितीन नांदगावकर यांना मनसेचं विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट ही मिळणार होतं. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी मनसेला सोडचिठठी देत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

==================================================

मनसेची दुसरी यादी

डोंबिवली - मंदार हळबे

धुळे (शहर) - प्राची कुलकर्णी

जळगाव (शहर) - जमील देशपांडे

जळगाव (ग्रामीण) - मुकुंद रोटे

अमळनेर - अंकलेश पाटील

अकोट - रवींद्र फाटे

रिसोड - विजयकुमार उल्लामाळे

कारंजा - सुभाष राठोड

पुसद - अभय गेडाम

नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे

परभणी - सचिन पाटील

गंगाखेड - विठ्ठल जवादे

परतूर - प्रकाश सोळंखे

वैजापूर - संतोष जाधव

भिवंडी पश्चिम - नागेश मुकादम

भिवंडी पूर्व - मनोज गुडवी

कोपरी-पाचपाखाडी - महेश कदम

ऐरोली - निलेश बाणखेले

अंधेरी पश्चिम - किशोर राणे

चांदिवली- सुमीत भारस्कर

राजूरा - महालिंग कंठाडे

राधानगरी - युवराज येडूरे

अंबरनाथ - सुमेत भंवर

डहाणू - सुनिल निभाड

बोईसर - दिनकर वाढान

शिवडी - संतोष नलावडे

विलेपार्ले - जुईली शेंडे

किनवट - विनोद राठोड

फुलंब्री - अमर देशमुख

उमरखेड- रामराव वानखेडे

घाटकोपर पूर्व - सतीश पवार

अणुशक्तीनगर - विजय रावराणे

मुंबादेवी - केशव मुळे

श्रीवर्धन - संजय गायकवाड

महाड - देवेंद्र गायकवाड

सावंतवाडी - प्रशांत रेडकर

श्रीरामपूर - भाऊसाहेब पगारे

बीड - बैभव काकडे

मोहळ- हनुंत भोसले

उमरेड - मनोज बावनगडे

==================================================

मनसेची पहिली यादी

कल्याण ग्रामीण - प्रमोद राजू रतन पाटील

कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर

नाशिक पूर्व - अळोक मुर्तडक

माहिम - संदीप देशपांडे

हडपसर - वसंत मोरे

कोथरूड - किशोर शिंदे

नाशिक मध्य - नितीन भोसले

वणी - राजू उंबरकर

ठाणे- अविनाश जाधव

मागाठाणे - नयन कदम

कसबा पेठ - अजय शिंदे

सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील

नाशिक पश्चिम - दिलीप दातीर

इगतपुरी - योगेश शेवरे

चेंबूर - कर्णबाळा दुनबळे

कलिना - संजय तुर्डे

शिवाजीनगर - सुहास निम्हण

बेलापूर - गजानन काळे

हिंगणघाट - अतुन वंदिले

तुळजापूर - प्रशांत नवगिरे

दहिसर - राजेश येरूणकर

दिंडोशी - अरुण सुर्वे

कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे

गोरेगाव - विरेंद्र जाधव

वर्सोवा - संदेश देसाई

घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल

वांद्रे पूर्व - अखिल चित्रे

==================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2019 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...