• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • भाजपने कोळसा घोटाळेबाजांकडून देणग्या घेतल्या, संजय राऊतांचा गंभीर आरोप

भाजपने कोळसा घोटाळेबाजांकडून देणग्या घेतल्या, संजय राऊतांचा गंभीर आरोप

 'यूपीए सरकार होते तेव्हा कोळसा घोटाळ्यावर भाजपने संसद बंद पाडली होती. संसदेचं कामकाज भाजपने करू दिलं नाही. मात्र सत्तेत आल्यावर...

'यूपीए सरकार होते तेव्हा कोळसा घोटाळ्यावर भाजपने संसद बंद पाडली होती. संसदेचं कामकाज भाजपने करू दिलं नाही. मात्र सत्तेत आल्यावर...

'यूपीए सरकार होते तेव्हा कोळसा घोटाळ्यावर भाजपने संसद बंद पाडली होती. संसदेचं कामकाज भाजपने करू दिलं नाही. मात्र सत्तेत आल्यावर...

 • Share this:
  औरंगाबाद, 13 नोव्हेंबर : कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कोळसा टंचाईवरून मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर, कोळसा घोटाळेबाजाकडूनच (coal scam) भाजपने (bjp) मोठ्या देणग्या घेतल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. औरंगाबाद शहरात आज शिवसेनेकडून महागाईविरोधात आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्च्यानंतर संजय राऊत हे एमजीएम पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. 'यूपीए सरकार होते तेव्हा कोळसा घोटाळ्यावर भाजपने संसद बंद पाडली होती. संसदेचं कामकाज भाजपने करू दिलं नाही. मात्र सत्तेत आल्यावर याच भाजपने कोळसा घोटाळा करणाऱ्याकडून मोठं मोठ्या देणग्या घेतल्या, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला. सत्यवानाला' वाचवण्यासाठी जंगलात नक्षलवाद्यांकडे मुलासह पोहोचली 'सावित्री' तसंच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाळकडू हा सिनेमा काढला होता. आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. तसंच, जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर सुद्धा एक सिनेमा बनवत आहे, अशी घोषणाही संजय राऊत यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'जयभीम' सिनेमा तुम्ही बघितला का, असं विचारलं असता राऊत म्हणाले की, जयभीम सिनेमामी बघितला आहे.  चांगला सिनेमा आहे. जयभीम हा जातीवाचक शब्द नाही तर संविधानाचा विजय म्हणजे जयभीम असा आहे, असंही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, आज महागाईच्या विरोधात औरंगाबादेत शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात संजय राऊत यांनी भाषण करताना भाजपवर हल्ला चढवला. संजय राऊत म्हणाले, त्रिपुरात काही झालं आणि दंगे सुरू झाले. महागाईवरुन जनतेने लक्ष हटवण्यासाठी हे सुरू केलं. महागाईचा प्रश्न विचारला की, हिंदू-मुसलमान, पाकिस्तान-भारत-चीन भारत असे विषय काढले जातात. दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, नाना पटोलेंचा थेट आरोप 'महाराष्ट्रात दंगली पेटवण्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रात आग लावायची आणि राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. औरंगाबादचा मोर्चा इशारा आहे, आम्हाला हात लावला तर हात पेटवल्या शिवाय राहणार नाही. कितीही कारस्थान झाले तरी महाराष्ट्रात शिवसेना तुमच्या छताड्यावर पाय देऊन पुढं जाणार आहे, असंही राऊत म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published: