Home /News /national /

'सत्यवानाला' वाचवण्यासाठी जंगलात नक्षलवाद्यांकडे मुलांसह पोहोचली 'सावित्री'

'सत्यवानाला' वाचवण्यासाठी जंगलात नक्षलवाद्यांकडे मुलांसह पोहोचली 'सावित्री'

तिने नक्षलवाद्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.

    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : बिजापूरमध्ये (Bijapur news) रस्ते बांधणीच्या निरीक्षणासाठी गेलेल्या इंजिनिअरचं नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्यासोबत एक शिपाई होता. दुपारी 1 वाजता निघाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते परतले नाही. त्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. आता इंजिनिअरच्या शोधात पत्नी आपल्या मुलांसह जंगलात निघाली आहे. इतकच नाही तिने नक्षलवाद्यांकडे (Naxal Area) पतीला सोडण्याची विनंती केली आहे. सह इंजिनिअर अजय रोशन लकडा बिजापूरमधील पीएसजीएसवायमध्ये काम करतात. ते गुरुवारी दुपारी 1 वाजता शिपाई लक्ष्मणसोबत परतागिरी गोरना मनकेली भागात सुरू असलेलं रस्त्याचं काम पाहात होते. मात्र दोघे मुख्यालयात पोहोचले नाही. शोध घेतल्यानंतर कळालं की, नक्षलवाद्यांनी दोघांचं अपहरण केलं आहे. यानंतर इंजिनिअरच्या कुटुंबात गोंधळ उडाला. त्यांची पत्नी अर्पिताने नक्षलवाद्यांकडे पतीची सुखरुप सुटका करण्याची अपील केली आहे. अर्पिताने नक्षलवाद्यांना विनंती केली आहे की, एका बहिणीनी विनंती मान्य करा. माणुसकी दाखवा. माझा पती एक चांगला व्यक्ती आहे. जेव्हापासून पतीच्या अपहरणाचं वृत्त कळालं तेव्हापासून आम्ही काहीच खाल्लं नाही. आमचा 3 वर्षांचा मुलगा आहे. माझ्या बाळाच्या डोक्यावर वडिलांची छत्रछाया कायम असू द्यावी यासाठी तुम्हाला विनंती आहे. हे ही वाचा-आता दहशतवाद्याला बसेल चाप! जम्मू काश्मीरमध्ये लागले CCTV दिलासादायक बाब म्हणजे शिपाई लक्ष्मण परतागिरीहून सकुशल घरी पोहोचले. मात्र त्यांनी अद्याप काहीच सांगितलेलं नाही. दोघांचं अपहरण केल्याबद्दलच त्यांनी सांगितलं आहे. दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं. गोरना मनकेली नक्षलवाद्यांचा परिसर आहे. या भागात सरकारी कामाचा विरोध केला जातो. याच कारणामुळे दोघांचं अपहरण केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Naxal Attack, Wife and husband

    पुढील बातम्या