गुहागर, 15 जुलै: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. त्यात गुहागरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचा नेताच आपल्या राहत्या घरी राजरोसपणे दारू विक्री करत होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठा मद्यसाठा जप्त केला आहे.
हेही वाचा...धक्कादायक: व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा COVID-19ने झाला मृत्यू
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू सावंत यांच्या घरावर गुहागर पोलिसांना बुधवारी अचानक धाड टाकली. त्यात हा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. शिवसेना नेत्याच्या घरातील मद्यसाठा पाहून तर पोलिसही चक्रावले आहेत.
गुहागरमध्ये मागील 4 दिवसांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.
दुसरीकडे मात्र शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत हे आपल्या राहत्या घरात छुप्या पद्धतीने दारूची विक्री करत होते. यावेळी गुहागर पोलिसांनी त्यांच्या घरावर अचानक धाड टाकून सगळा दारू साठा जप्त केला आहे. एकीकडे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा वाढता प्रभाव नष्ट करण्यासाठी विविध प्रकारे लढा देत आहे. मात्र गुहागरमधील सत्ताधारी पक्षाचा जबाबदार पदाधिकारी मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा धाब्यावर बसवत खुलेआम दारू विक्री करताना रंगेहात सापडला आहे. जबाबदार व्यक्ती कायद्याचं उल्लंघन करत असतील तर सामान्यांच काय, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा...ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीचा घरोबा, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध
आपत्ती व्यवस्थापन कायदा धाब्यावर बसवत राहत्या घरात दारूची विक्री करणाऱ्या बाबू सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवसेना नेत्याविरुद्ध गुहागर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shiv sena