Home /News /news /

धक्कादायक: व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा COVID-19ने झाला मृत्यू

धक्कादायक: व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा COVID-19ने झाला मृत्यू

डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (वय 61) असं त्या माजी शास्त्रज्ञांचं नाव आहे. पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियातून ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले होते.

पुणे 15 जुलै: व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. बुधवारी (15 जुलै) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (वय 61) असं त्या माजी शास्त्रज्ञांचं नाव आहे. पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियातून ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान,  पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   3.15  टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. BREAKING : ऑक्सफर्डच्या COVID-19 लशीसंदर्भात उद्या येऊ शकते Good News पुणे जिल्ह्यातील 42 हजार 846 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 26 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 424 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे. कोरोनाच्या आणखी एका लक्षणाचा लागला शोध, तुम्हीही घ्या काळजी! कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 11 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 724, सातारा जिल्ह्यात 106, सोलापूर जिल्ह्यात 69, सांगली जिल्ह्यात 27 तर कोल्हापूर जिल्ह्यात 85 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या