प्रीतम पंडित, सोलापूर 19 सप्टेंबर : सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण देण्यात आलं. या आरक्षणाबाबत आता सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावईही गुजराती होता. त्यामुळे मला ते करावं लागलं, असा गौप्यस्फोट आता त्यांनी सोलापूरमध्ये बोलताना केला आहे.
gram panchayat election result : ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला कल हाती, मविआची आघाडी, भाजप-शिंदे गट पिछाडीवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, की ‘मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी केले होते. पण लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केलं. जावयाला सांभाळायचं म्हटल्यावर हे सगळं करावं लागतं’, असंही ते म्हणाले. पुढे सुशीलकुमार म्हणाले, की हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो. ही साधी गोष्ट नव्हती. पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षातील लोकांनीच मला कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरू काढलं आणि राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवलं. पण ठीक आहे. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. मात्र, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अजूनपर्यंत आहे, असंही ते म्हणाले. राज ठाकरे आज पुन्हा घेणार चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; भेटीमागचं कारण आलं समोर पक्षाला घरचा आहेर दिल्यानंतर, काहीही झालं तरी आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं, असंही पुढे त्यांनी म्हटलं. सोलापुरातील एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुशीलकुमार शिंदे याबद्दल बोलले. सुशीलकुमार शिंदे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.