मुंबई, 19 सप्टेंबर : राज्यात सत्तानाट्यानंतर पहिली निवडणूक पार पडत आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागला आहे. यातील 61 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीने शिंदे गट आणि भाजप युतीवर भारी पडली आहे. महाविकास आघाडीने 23 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. तर भाजपने 19 जागा जिंकल्या आहेत. राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 608 ग्रामपंचायतींपैकी 51 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 15 जागा जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाने 4 तर शिवसेनेनं 2 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 6 जिंकल्या असून इतर 9 जागांवर विजयी झाले आहे. महाविकास आघाडीने एकूण 23 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. तर भाजप आणि शिंदे गट युतीने 19 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 76 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. शिंदे-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेतला होता.. त्यानंतरची ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातल्या 149 ग्रामपंचायतींची रणधुमाळी रंगली होती. यातील 12 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या आहेत. तर 137 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रीया पार पडली आहे. जवळपास 79 टक्के मतदान झाले असुन मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपला कौल दिला हे काही वेळात स्पष्ट होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.