मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठा दिलासा ! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहप्रवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह

मोठा दिलासा ! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहप्रवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह

Dombivli News: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. याच दरम्यान आफ्रिकेतून भारतात आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

Dombivli News: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. याच दरम्यान आफ्रिकेतून भारतात आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

Dombivli News: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. याच दरम्यान आफ्रिकेतून भारतात आलेल्या प्रवाशांचे रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

डोंबिवली, 3 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Omicron) आढळून आला आहे. याच दरम्यान आफ्रिकेतून भारतात आलेल्या प्रवाशांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती हा डोंबिवलीतील (Dombivli) आहे. या प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला त्ताकाळ क्वारंटाईन करुन उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच त्याचा जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले. याच दरम्यान या प्रवाशासोबत प्रवास केलेल्या नागरिकांचीही माहिती घेत त्यांची चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. या प्रवाशासोबत प्रवास करत असलेल्या सहप्रवाशाचा अहवाल आता आला आहे.

आफ्रिकेहून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्या व्यक्तीसोबत असलेल्या प्रवाशाची चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आणि त्याचा अहवाल आता आला आहे. या प्रवाशाचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे. यासोबतच त्याच्या तीन नातेवाईकांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती कल्याण डोंबिवली साथरोग नियंत्रण आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीतल आलेला व्यक्ती विमानाने आफ्रिकेतून दिल्लीला आला आणि त्यनंतर दिल्ली ते मुंबई असा त्याने प्रवास केला होता. यावेळी त्याच्यासोबत प्रवास केलेल्या प्रवाशांची माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात आली होती आणि त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

वाचा : Omicron विरुद्ध लढण्यासाठी Covaxin लस अधिक प्रभावी असू शकते: ICMR

राज्यातील 28 नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी

महाराष्ट्रात आतापर्यंत विदेशातून आलेल्या एकाही रुग्णाचा जिनोम सिक्वेन्ससाठीचा नमूनाचा अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे अद्यापतरी राज्यात या नव्या विषाणूचा शिरकाव झालेला नाही, असं बोललं जातंय. पण राज्याची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत राज्यातील 28 नमुने हे जिनोम सिक्वेन्ससाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल येण्यास थोडा वेळ लागतो. राज्यातील विविध भागातील रुग्णांचे नमूने पुण्यात जिनोम सिक्वेन्सिंग पाठवण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि पुण्यात जिनोम सिक्वेन्सिंगचं काम सुरु असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत 76 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आले असून त्यापैकी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांचे आज किंवा परवा रिपोर्ट येतील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

वाचा : परदेश प्रवास न करताही Omicronची लागण; भारतात सापडलेल्या रुग्णाबाबत धक्कादायक माहिती

कर्नाटकात दोघांना ओमायक्रोन

कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात 66 आणि 46 वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. विशेष म्हणजे जगभरात जे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत त्यांच्यातदेखील आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळले असल्याची माहिती समोर आल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Dombivali, महाराष्ट्र