ठाणे, 10 जुलै: मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यात ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 12 जुलैपर्यंत असलेला लॉकडाऊन आता 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन 19 जुलैला सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी 416 ने वाढ झाली. शहरात रुग्णांची संख्या 12469 झाली आहे. आतापर्यंत 6954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 463 जणांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा… सांगली हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ठाणे शहरात 2 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपासून 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होती. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे आणखी काही कालावधीसाठी लॉकडाऊन वाढवणे गरजेचं असल्याचं महानगरपालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींनाच कामावर जाण्याची मुभा असेल. या व्यतिरिक्त बाकीच्या अटी व नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहातील, असं आयुक्तानी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. पालकमंत्र्यांनी दिले होते संकेत… लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ठाणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावं लागेल, असं वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं आहे. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कळवा, मुंब्रा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ज्या ठिकाणी संसर्ग वाढला आहे. त्या भागात नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजारांवर पोहोचली आहे. हेही वाचा… VIDEO: शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, प्रदेश सरचिटणीसला नेलं फरपटत दरम्यान, गेल्या आठवड्यात लॉकडाऊन उठवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी पुन्हा एका लॉकडाऊन करावं, अशी मागणी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.