Home /News /national /

VIDEO : 'आम्ही ड्युटी करतो आणि इथंच थुंकताय?' ट्राफिक पोलिसाने त्याला रस्ता धुवायला लावला

VIDEO : 'आम्ही ड्युटी करतो आणि इथंच थुंकताय?' ट्राफिक पोलिसाने त्याला रस्ता धुवायला लावला

दुचाकीस्वार रस्त्यावर थुंकला होता म्हणून ट्राफिक पोलिसांनी त्याला ही शिक्षा दिली.

    चंदिगढ, 12 मे : चंदिगढ शहरातील ट्रिब्यून चौकात एका नाक्यावर ट्राफिक पोलिसाने दुचाकीस्वाराकडून रस्ता स्वच्छ करून घेतला. दुचाकीस्वार त्याआधी रस्त्यावर थुंकला होता म्हणून ट्राफिक पोलिसांनी त्याला ही शिक्षा दिली. ट्रिब्यूनने दिलेल्या बातमीनुसार, ट्राफिक पोलीस बलदेव सिंग यांनी एका दुचाकीस्वाराला रस्त्यावर थुंकताना पाहिलं. चेकपोस्टजवळ येताच त्याला अडवलं आणि हाताने रस्त्यावर जिथं थुंकला होता ती जागा स्वच्छ करायला लावली. ट्राफिक पोलिसाने दुचाकीस्वाराला थुंकलेली जागा स्वच्छ करण्यास सांगितली. तेव्हा दुचाकीस्वाराने जवळचं गवत घेऊन थुंकी पुसून काढली. त्यानंतर ट्राफिक पोलिस त्याच्याजवळ पाण्याची बाटली घेऊन गेला आणि हाताने ती जागा धुवायला सांगितली. दुचाकीस्वार रस्ता धुवत असताना मागून एक पोलीस कर्मचारी म्हणतो की, असं थुंकणं चांगलं असतं का, मुलांसोबत जात असताना एवढी मोठी चूक करत आहात. याची खूप मोठी शिक्षा आहे. असं कधीच करू नका. आम्ही इथं ड्युटी करतोय आणि तुम्ही इथंच थुंकताय? अशी चूक पुन्हा करू नका. ट्राफिक पोलिसाने सांगितलं की, मी पाण्याची बाटली यासाठी सोबत घेऊन गेलो कारण ती व्यक्ती पाण्याने ती जागा स्वच्छ करेल. पण त्याने गवताने फक्त पुसून काढलं. हे वाचा : पीडितेच्या व्हिडिओने शहर हादरलं, तक्रार नाकरणाऱ्या पोलिसांनी आरोपीलाच केली अटक रस्त्यावरची थुंकी पुसायला त्याला कोणी फोर्स केलं नव्हतं. तो स्वत:च पुढे आला होता असंही बलदेव सिंग यांनी सांगितलं. सोशल मीडियावर दुचाकीस्वाराला ट्रोलही केलं जात आहे. हे वाचा : सरकारकडून मिळाली नाही मदत, अखेर 7000 गावकऱ्यांनी असा उभारला 1 कोटींचा पूल
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Viral

    पुढील बातम्या