कोरोनाच्या संकटात AC Train चा प्रवास सुरक्षित आहे का?

कोरोनाच्या संकटात AC Train चा प्रवास सुरक्षित आहे का?

तज्ज्ञांच्या मते, एसी ट्रेनमधून (AC train) प्रवास केल्यानं कोरोना इन्फेक्शनचा धोका वाढतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : कोरोनाव्हायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (lockdown) लागू करून जवळपास 50 दिवस झाले. त्यानंतर आता विविध राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या घराची आस लागली आहे. त्यांना त्यांच्या राज्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेनं (indian railway) आजपासून विशेष रेल्वे सेवा (train service) सुरू करण्याचा निर्णय घेतला.

रेल्वेनं सांगितल्यानुसार, या सर्व ट्रेन एसी ट्रेन्स (AC Trains) असतील. सध्याचा उकाडा पाहता या एसी ट्रेननं प्रवास म्हणजे प्रत्येकासाठी सोयीचा असेल मात्र ज्या अशा सेंट्रलाइज एसी (Centralized AC) ट्रेनमध्ये प्रवास करणं सुरक्षित असेल का? कारण जागतिक आरोग्य संघटनेसह कित्येक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एसीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका जास्त होतो.

हे वाचा - दिलासादायक बातमी, देशातील 'या' राज्यांत कोरोनाला एंट्री नाही म्हणजे नाहीच!

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाग्रस्त व्यक्तीचे ड्रॉपलेट्स हवेमार्फत जर सेंट्रलाइज एसीपर्यंत पोहोचले तर ती खोली, बोगी किंवा बसमधील इतर व्यक्तींनाही व्हायरसची लागण होण्याचा धोका आहे. असंच प्रकरण चीनमध्ये दिसून आलं आहे. एसी रेस्टॉरंटमध्ये लक्षणं न दिसणाऱ्या एका कोरोनाग्रस्त व्यक्तीमुळे 8 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळेच आथा भारतात कोरोना रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या बहुतेक रुग्णालयातही सेंट्रलाइज एसी बंद ठेवण्यात आलेत.

जसलोक रुग्णालयाचे डॉ. रोहन सिकेयारा यांनी सांगितलं की, "एसी बोगीत कोणत्याही प्रकारे संक्रमण रोखू शकत नाही. एसी बोदी पूर्णपणे बंद असतात आणि दूरच्या प्रवासादरम्यान कोरोनाव्हायरस जास्त पसरू शकतो. सेंट्रलाइज एसीमध्ये हवा रि-सर्क्युलेट होते. फक्त कोरोनाव्हायरसच नाही तर इतर इन्फेक्शनही सेंट्रलाइद एसीमुळे वेगानं पसरतात असं दिसून आलं आहे"

डॉ. केआर ढेबरी म्हणाले, "उष्णता वाढली आहे आणि त्यामुळे एसी ट्रेन उत्तम पर्याय आहे. मात्र या कोरोनाचे लक्षणं नसलेले रुग्ण समस्या ठरू शकतात. अशी अनेक प्रकरणं आहेत, ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र तरी असे रुग्ण कोरोना पसरवू शकतातच असंही नाही"

हे वाचा - दिलासा की चिंता? कोरोनाच्या दहशतीत 'या' आजाराचे रुग्ण कमी झाले

"व्हायरस एसीच्या फिल्टरमध्ये अडकतात आणि संक्रमण पसरवतात. त्यामुळे एसी फिल्टर आवश्यक ती काळजी घेऊन वारंवार स्वच्छ करायला हवं. एसी बोगीत सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे 2 प्रवाशांच्या मध्ये एक सीट रिकामी असायला हवी, जेणेकरून संक्रमण काही प्रमाणात रोखण्यात मदत मिळेल. मास्क न घालणाऱ्या प्रवाशाला दंड ठोठवावा" असंही ते म्हणाले.

रेल्वे प्रवास करताना नियम

प्रवाशांना दोन तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचणे आवश्यक आहे.

ज्या प्रवाशांकडे कन्फर्म्ड आणि वैध तिकीट असेल त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक राहील. मास्कसाठी तुम्ही गमछा किंवा स्कार्फचा देखील वापर करू शकता.

रेल्वे सुरू होण्याआधी रेल्वे प्रवाशांना स्क्रिनिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

प्रवासादरम्यान सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणं आवश्यक आहे.

ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण नाही आहेत, त्यांनाच रेल्वेमध्ये चढण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सर्व प्रवाशांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे गरजेचे आहे, अन्यथा ट्रेनमध्ये चढता येणार नाही.

ट्रेनमध्ये तुम्हाला रेल्वे विभागाकडून चादर किंवा पांघरूण मिळणार नाही. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता शासनाने ही योजना बंद केली आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 12, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading