बापरे! 5000 लोकसंख्येचं गाव आणि सरपंचपदाचा लिलाव, 42 लाखांची लागली बोली

नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील वाघेश्वरी देवीवर गावातील नागरिकांची अपार श्रद्धा आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील वाघेश्वरी देवीवर गावातील नागरिकांची अपार श्रद्धा आहे.

  • Share this:
    नंदूरबार, 24 डिसेंबर: सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे (gram panchayat election) वारे वाहत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात नंदूरबार जिल्ह्यातील (nandurbar district) साधारण 5 हजार लोकसंख्येच्या एका आदिवासी गावात सरपंचपदासाठी सुमारे 42 लाख रुपयांची बोली लागल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे चार प्रभाग आणि 13 सदस्य असलेली ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी काही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. एका छोट्या गावाच्या सरपंचपदासाठी लाखोंची बोली लागल्यानं राज्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. हेही वाचा...Corona Vaccine मध्ये डुकराची चरबी? मुस्लिम संघटनांनी घेतला मोठा निर्णय दैनिक 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील वाघेश्वरी देवीवर गावातील नागरिकांची अपार श्रद्धा आहे. त्यात एकदा तरी घरातील एक सदस्य गावचा सरपंच व्हावा, यासाठी वाघेश्वरी देवीच्या मंदिराला सुमारे 42 लाख रुपयांची देणगी देऊन पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याचा मानस खोंडामळी येथील प्रदीप वना पाटील यांनी व्यक्त केला आहे. सरपंचपदाचा लिलाव.. खोंडामळी हे 5 हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे. मात्र, गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी जो सर्वात जास्त देणगी देईल, त्याची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्णी लागेल, असं ठरवण्यात आलं. यासाठी गावातील अनेक लोक पुढे आले. मात्र, सर्व पक्षातील इच्छूकांनी सरपंचपदासाठी बोली देखील लावली. साधारण 25 लाखांपासून 38 लाखांपर्यंत बोली लावण्यात आली. आपल्या ताब्यात एकदा तरी गावाची ग्रामपंचायत यावी, असा मानस गावातील प्रदीप वना पाटील यांनी व्यक्त केला. प्रदीप पाटील यांनी थेट 42 लाखांची बोली लावली आणि हीच बोली अंतिम ठरली. आता याच पैशातून खोंडावळी येथील वाघेश्वरी देवीचं मंदिर उभारण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोर यांनी देखील प्रदीप पाटील यांना यात प्रोत्साहन दिल्याचं समजतं. प्रदीप पाटील सरपंचपदासाठी पात्र नाहीत... प्रदीप पाटील यांनी गावात देवीचं मंदिर उभारण्यासाठी सर्वाधिक देणगी दिल्यानं सरपंचपदाची माळ त्यांच्याच घरातील एका व्यक्तीच्या गळ्यात पडणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याशिवाय प्रदीप पाटील सांगतील तेच सदस्य ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध घेतले जाणार आहेत. प्रदीप पाटील यांना चार आपत्ये आहेत. त्यामुळे प्रदीप पाटील किंवा त्यांची पत्नीला सरपंच होता येणार नाही. त्यामुळे त्यांची मुलीची सरपंचपदी वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. हेही वाचा..मॉर्निग वॉक करणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला चिरडलं, मद्यधुंद अवस्थेत होता ट्रॅक्टर दरम्यान, एखाद्या गावात सरपंचपदासाठी एवढी मोठी बोली लागल्याची ही राज्यात पहिलीच घटना असावी, यामुळे राज्यभर याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र, गावातील काही नागरिकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. परंतु, गावाच्या विकासासाठी व गावात एकोपा राहावा, यासाठी हा विरोध काही दिवसांत मावळेल, असंही बोललं जात आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आणखी काय घडामोडी होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: