पंढरपूर, 07 नोव्हेंबर : पंढरपूर (pandharpur) ते आळंदी (aalandi) या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर (pandharpur) या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची (Sant Tukaram Maharaj Palkhi Highway) पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी (pm narendra modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे.
येत्या 8 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या मार्गांच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला ‘पालखी’साठी विशेष समर्पित पदपथ बांधला जाणार आहे.
Pandharpur has a special place in the hearts and minds of many. The Temple there draws people from all sections of society, from all over India. At 3:30 PM tomorrow, 8th November, I will join a programme relating to upgrading Pandharpur’s infra needs. https://t.co/IUCE0L3dZT
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 8 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या (NH-965G), तीन विभागांचे भूमिपूजन करणार आहेत.
मोहम्मद शहजाद हे काय केलंस? अफगाणिस्तानची घोडचूक टीम इंडियाला पडली भारी
हे प्रकल्प पंढरपूरला भाविकांची ये-जा करणे सुलभ व्हावे यासाठी सुरू करण्यात येत आहेत. या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला ‘पालखी’ साठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्यामुळे भाविकांना विनाअडथळा आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध होईल.
दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किमीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पाटस ते तोंडाळे-बोंडाळे असा सुमारे 130 किमीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, या मार्गांचे चौपदरीकरण करून त्यांच्या दोन्ही बाजूंना पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्याचा प्रस्तावित खर्च अनुक्रमे सुमारे 6690 कोटी रुपये आणि सुमारे 4400 कोटी रुपये इतका आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पंढरपूरचा विविध ठिकाणांहून संपर्क वाढविण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवरील 223 किलोमीटरहून अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित करतील. ज्याची अंदाजे किंमत 1180कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्रकल्पांमध्ये म्हसवड-पिलीव -पंढरपूर (NH 548E), कुर्डुवाडी - पंढरपूर (NH 965C), पंढरपूर - सांगोला (NH 965C), NH 561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि NH 561A चा पंढरपूर - मंगळवेढा - NH 5-A या रस्त्यांचा समावेश आहे.
तुम्हालाही वनविभागात नोकरी करायची आहे? मग ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा
या समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील प्रमुख संत मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.