Home /News /sport /

T20 World Cup : मोहम्मद शहजाद हे काय केलंस? अफगाणिस्तानची घोडचूक टीम इंडियाला पडली भारी

T20 World Cup : मोहम्मद शहजाद हे काय केलंस? अफगाणिस्तानची घोडचूक टीम इंडियाला पडली भारी

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा (New Zealand vs Afghanistan) पराभव करताच टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगलं.

    अबु धाबी, 7 नोव्हेंबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर टीमचा अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध दणदणीत विजय झाला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भारताचं सेमी फायनलमध्ये पोहोचणं अफगाणिस्तानवर अवलंबून होतं. अफगाणिस्तानने जर न्यूझीलंडचा (Afghanistan vs New Zealand) पराभव केला असता आणि भारताने नामिबियाला हरवलं असतं तर विराटची टीम सेमी फायनलला पोहोचली असती. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम न्यूझीलंडचा 8 विकेटने विजय झाला. अफगाणिस्तानने दिलेलं आव्हान न्यूझीलंडने 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. केन विलियमसन (Kane Williamson) 40 रनवर आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) 36 रनवर नाबाद राहिले. छोट्या आव्हानाचा बचाव करायला आलेल्या अफगाणिस्तानने न्यूझीलंडच्या दोन विकेट घेतल्या, यानंतर त्यांनी न्यूझीलंडच्या रन काढण्यावरही ब्रेक लावला. रनची गती रोखल्यामुळे न्यूझीलंडची टीमही थोडीफार तणावात आली होती, तसंच भारतीयांच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. सामन्याचं चित्र पलटण्यासाठी एका विकेटची गरज होती, जी त्यांना मिळालीही असती, पण अफगाणिस्तानने घोडचूक केली. 11 व्या ओव्हरच्या सुरुवातीला डेवॉन कॉनवे स्ट्राईकवर होता, तेव्हा अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) हमीदच्या हातात बॉल दिला. या ओव्हरच्या सुरुवातीलाच कॉनवे 2 बॉलमध्ये 2 रनवर खेळत होता. ओव्हरचा तिसरा बॉल कॉनवेच्या बॅटला लागला आणि अफगाणिस्तानचा विकेट कीपर असलेल्या मोहम्मद शहजादच्या (Mohammad Shahzad) हातात गेला, पण अफगाणिस्तानच्या टीमने अपील केलं नाही. रिप्लेमध्ये कॉनवेच्या बॅटला बॉल लागल्याचं निष्पन्न झालं. बॅटरच्या बॅटला बॉल लागला का नाही, हे बहुतेकवेळा विकेट कीपरला समजतं, पण मोहम्मद शहजादने मात्र मोठी चूक केली. शहजादची ही चूक फक्त अफगाणिस्तानलाच नाही तर भारतालाही भारी पडली. कारण डेवॉन कॉनवे 36 रनवर नाबाद राहिला. सेमी फायनलच्या चारही टीम ठरल्या यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा अखेरचा सामना नामिबियाविरुद्ध आहे, पण या सामन्याला काहीच अर्थ उरलेला नाही, कारण सेमी फायनलच्या चारही टीम ठरल्या आहेत. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तान आणि न्यूझीलंड या टीम सेमी फायनलमध्ये पोहोचल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Team india

    पुढील बातम्या