Home /News /maharashtra /

पशुधन वाऱ्यावर सोडून पशुवैद्यकीय अधिकारी करत आहे टेम्प्रेचर मोजण्याचे काम!

पशुधन वाऱ्यावर सोडून पशुवैद्यकीय अधिकारी करत आहे टेम्प्रेचर मोजण्याचे काम!

अहमदनगर जिल्ह्यातील 63 पशुवैद्यकीय दवाखान्याला टाळे लागले आहेत. त्यामुळे उपचाराअभावी शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत.

अहमदनगर, 24 एप्रिल: जिल्हाधिकाऱ्यांच्या अजब फतव्यामुळे पशुधन धोक्यात सापडलं आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लाखो पशुधनाला वाऱ्यावर सोडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना नाक्यावर माणसांचे ताप मोजण्याचे काम सोपवण्यात आलं आहे. जिल्ह्यातील 63 पशुवैद्यकीय दवाखान्याला टाळे लागले आहेत. त्यामुळे उपचाराअभावी शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. जनावरांची अवघड शस्त्रक्रिया करणारे हे डॉक्टर जिल्ह्यातील नाक्यावर थर्मामीटरने माणसाचा ताप चेक करत आहेत. खरं तर हे ताप चेक करण्याचं किरकोळ काम कोणीही करू शकतो. मात्र जनावरांची अवघड शस्त्रक्रिया या डॉक्टरांशिवाय कोणीही करू शकणार नाही. मात्र, अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी मात्र गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे जिल्ह्याच्या सीमेवर माणसांचा थर्मामीटरने ताप मोजत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडील जनावरे मात्र उपचाराअभावी दगावत आहेत. हेही वाचा.. 'बारामती पॅटर्न': केंद्रीय समितीकडून कोरोना वॉरीयर्स, सोल्जर, फायटरचं कौतुक अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 63 पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी यांना रस्त्यावर ताप मोजण्यासारख्या किरकोळ कामासाठी उभे करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे काय याचा कोणताही विचार झाला नसल्याचे दिसत आहे. कारण अहमदनगर जिल्ह्यातील गायींची संख्या जवळपास 14 लाख आहे तर म्हशींची संख्या 2 लाख आहे. इतर जनावरेही लाखोंच्या घरात आहेत. या सर्वांना या एका निर्णयाने वाऱ्यावर सोडून दिलं आहे.डॉक्टरांचे खरं काम आहे जनावरांच्या अवघड शस्त्रक्रिया करणं, गर्भ अवघडलेल्या गायी म्हशींची सुटका करणं, अशा शेकडो सर्जरी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जावून हे डॉक्टर करत असतात. मात्र, आता ते नाक्यावर ताप मोजायला गेल्याने शेतकरी आणि पशुधन अडचणीत सापडलं आहे. हेही वाचा.. कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न फसला, चीनने वापरलेलं औषध क्लिनिकल ​चाचणीत फेल संगमनेर तालुक्यातील विकास गाडेकर हे तरूण शेतकरी गेल्या तीन दिवसापासून आपल्या गायीला वाचवण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात हेलपाटे मारत आहे. मात्र डॉक्टर काही भेटतच नाही. अखेर वेळीच उपचार न मिळाल्याने विकास गाडेकर यांच्या गायीनं शेवटचा श्वास घेतला आहे. दरम्यान, ही परिस्थिती एकट्या या शेतकऱ्याच्या घरची नाही. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचारांची गरज आहे. खरं तर हे डॉक्टर आपलं काम करायला तयार आहेत. मात्र ताप तपासण्याच्या किरकोळ कामाऐवजी त्यांनी त्यांची पशुसेवा करणं गरजेचं आहे. अशाप्रकारे निर्णय घेतले जात असल्यानं निर्णय घेताना समन्वय नसल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. काय म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना भेटण्याचा, फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपला फोन रिसिव्ह केला नाही तर अहमदनगर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हेही वाचा.. PM मोदींनी लॉन्च केली स्वामित्व योजना, गावकऱ्यांनी दिला 'दो गज दूरी'चा मंत्र कोरोनाच्या संकटाने शेतकरी आधीच उद्धवस्त झाला आहे. त्याच्या शेतमालाला आणि दुधाला कवडीमोल भाव मिळत आहे. आता दुभती जनावरेही उपचाराअभावी दगावली तर शेतकरी जगणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरं तर केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण आहे की पशू वैद्यकीय सेवा सुरू ठेवावी, मात्र नगर जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय पशुधनावर आणि पर्यायाने शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून तो त्वरीत मागे घेण्याची गरज, अशी मागणी केली जात आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ahmednagar, Corona, Coronavirus, Veterinary doctor, Veterinary hospital

पुढील बातम्या