माऊलीने केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक; म्हणाला, उद्धव ठाकरे लय भारी!

माऊलीने केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक; म्हणाला, उद्धव ठाकरे लय भारी!

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, त्याचं विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे

  • Share this:

मुंबई, 27 एप्रिल :  राज्यात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. त्यातही मुंबई-पुण्यात कोरोनाचे (Covid -19) रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. या अवघड परिस्थितीत राज्य सरकारही वेळोवेळी नागरिकांना घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती पूरवित आहेत. त्यांना सावधान करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील ही पहिली आव्हानात्मक घटना आहे. उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackray) राज्यात होणाऱ्या उपाययोजनांसाठी पुरेपुर प्रयत्न करीत आहे. सोशल मीडियावरदेखील उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं जात आहे. वेळोवेळी ते जनतेशी संवाद साधत आहेत.

अशातच अभिनेता रितेश देशमुख यांनी मुख्यमंत्री याच्या कामाचं कौतुक करणारं एक ट्विट केलं आहे. यामध्ये रितेशने लिहिले आहे की, 'सध्या देशवासीय एक मोठ्या संकटाशी सामना करीत आहेत. कोरोना व्हायरसशिवाय आपण भीती, चिंता यांच्याशीही लढा देत आहेत. अशा परिस्थितीतही आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नियमित जनतेशी संवाद साधत आहेत आणि परिस्थितीबाबत जनतेच्या मनात गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी स्पष्टता आणत आहेत. यासाठी मुख्यमंत्री करीत असलेले काम अभूतपूर्व आहे. त्यांच्याबद्दल आदर वाटतो.'

संबंधित -लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीमध्ये रंगला लुडोचा डाव, जिंकणारा थेट रुग्णालयात दाखल

'ज्या' महिलेची केली चौकशी तिचा झाला कोरोनाने मृत्यू, पोलीस अधिकारी हादरले आणि...

 

First published: April 27, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading